रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी, २६ फेब्रुवारी २०२१- महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या विषयपत्रिकेवरील विषयांच्या एकूण सुमारे ४३७ कोटी रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आज रात्री ८.३० वाजेपर्यंत चाललेल्या स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. आज त्यांच्या चेहऱ्यावर विशेष समाधान दिसत होते. त्यांना आपल्या कामाविषयी समाधानी आहात ? आणि स्थायी च्या इतर सदस्यांनी सहकार्य केले ? याविषयी बोलताना सांगितले की मी माझ्या सहकार्यानी केलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे व काही गोष्टींबाबत मतभेद असतात पण विकास कामांसाठी ते बाजूला ठेऊन सहकार्याने सर्वांनी काम केले आणि माझ्या कार्यकाळात जे विविध प्रकल्प आमचे भोसरीचे आमदार शहराध्यक्ष महेश लांडगे व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लोकोपयोगी प्रकल्प मार्गी लागण्याचे विशेष समाधान आहे त्यात विशेष मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतुळा व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पिपरी येथील पुतुळ्याच्या बाजूला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही पुतुळ्याच्या कामास व भव्य अभ्यासिका व कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे तेही काम लवकर पूर्ण होणार आहे असे सांगितले. विविध विषयांवर चर्चा झाली काही विषयाबाबत चर्चा करून विरोध नोंदवून विषय मंजूर करण्यात आले. व आज मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता याविषयी महापालिका वर्तुळात चर्चा सुरू होती.
प्रभाग क्र.११ मधील स्वामी विवेकानंद हॉल ते थरमॅक्स चौकाकडे जाणा-या रस्त्याचे तसेच कृष्णानगर मुख्य रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी २२ कोटी खर्च केले जातील.
नेहरुनगर परिक्षेत्रातील पाण्याच्या टाक्यांचे परिचालन आणि किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी १ कोटी ७५ लाख खर्च होणार आहे.
प्रभाग क्र.२४ मधील आरक्षण क्र.६२८ खेळाच्या मैदानात सिंथेटीक ट्रॅक बांधण्यासाठी ७२ लाख रुपये खर्च केले जातील.
सेक्टर क्र.२९ मधील भाजी मंडई परिसर विकसित करण्यासाठी ४२ लाख रूपये खर्च होणार आहे.
आकुर्डी गावठाण, गंगानगर आणि इतर परिसर, पिंपळे सौदागर व रहाटणी येथील जलनि:सारण विषयक सुधारणा कामे आणि नलिका टाकण्यासाठी १ कोटी १० लाख रुपये खर्च होतील.
चिखली, कासारवाडी, चिंचवड, पिंपळे निलख, किवळे मैला शुद्धीकरण केद्रांतर्गत येणा-या मैला पंप हाऊसेसचे चालन देखभाल दुरुस्तीसाठी ९ कोटी ५३ लाख रुपये खर्च येणार आहे.
भोसरी येथील सर्व्हे नं.१ शेजारिल नाल्याची सुधारणा आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी १७ कोटी रुपये खर्च येणार आहे.
चिखली येथील सेक्टर क्र.१७ आणि क्र.१९ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या गृह प्रकल्पामध्ये स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी ६२ लाख खर्च होतील.
काळेवाडी फाटा ते एमएम शाळेपर्यंतच्या तसेच सांगवी किवळे बीआरटीएस रस्त्यावर पदपथ व सायकल ट्रॅक विकसित करण्याच्या कामासाठी ३१ कोटी १८ लाख इतका खर्च होणार आहे.
भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक या रस्त्यावर बस स्थानक बांधण्यासाठी ७ कोटी ६७ लाख रूपये खर्च होतील या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.