सफाई कर्मचा-यांसाठी महानगरपालिकेने अधिकाधिक योजना राबवून त्यांचे आयुष्य उज्वल होईल यासाठी प्रयत्न करावे- नरेन दास

रोहित खर्गे
विभागीय संपादक

    पिंपरी दि २५ फेब्रुवारी २०२१ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आज दिल्लीवरुन आलेल्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या शिष्टमंडळाने भेट दिली. सचिव नरेन दास यांच्यासोबत आयोगाचे सल्लागार पुरम सिंग होते. या आयोगाने महापालिकेतील सफाई कर्मचा-यांच्याबाबतीत असलेल्या विविध विषयांचा आढावा घेतला. सफाई कर्मचा-यांना वेळेत वेतन अदा झाले पाहिजे, त्यांच्या तक्रारींना प्राध्यान्य देऊन त्यावेळेत सोडविल्या गेल्या पाहिजे, सफाई कर्मचा-यांची भरती प्राधान्याने केली पाहिजे. घरकुल योजनांमध्ये या कर्मचा-यांना घरे देण्याबाबत मनपाने पुढाकार घेतला पाहिजे, अशा विविध सुचना आयोगाचे सचिव नरेन दास यांनी केल्या.

      प्रारंभी या शिष्टमंडळाचे स्वागत आयुक्त राजेश पाटील आणि उपमहापौर केशव घोळवे यांनी केले. यावेळी नगरसदस्य माऊली थोरात, नगरसदस्या योगिता नागरगोजे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अजित पवार, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. के अनिल रॉय, उप आयुक्त सुभाष इंगळे, चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, राजेश आगळे, आरोग्य कार्यकारी अधिकारी विनोद बेंडाळे आदी उपस्थित होते.
बैठकीमध्ये चर्चा सूरु असताना उपमहापौर केशव घोळवे यांच्यामधील मूळतः कामगार असल्याने कामगार नेता जागृत झाला
  व उपमहापौर घोळवे यांनी लाड व पागे कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी पालिकेने त्वरित करावी सफाई कामगारांचे वेतन दहा तारखेच्या आत त्यांच्या खात्यावर किमान वेतन दराप्रमाणे जमा केले पाहिजे. मृत सफाई कामगाराच्या वारसास पालिकेच्या सेवेमध्ये त्वरित घेतले पाहिजे. सेवानिवृत्त झालेल्या रिक्त सफाई कामगारांच्या जागी त्वरित भरती केली पाहिजे. कामगारांना त्यांचे पीएफ व कायदेशीर लाभ कसे मिळतात व किती मिळतात याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांच्या आरोग्य बाबत वैद्यकीय तपासण्या वर्षातून दोन वेळा झाल्या पाहिजेत तसेच त्यांच्या परिवाराची वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे गंभीर आजार उद्भवला तर त्याचा संपूर्ण खर्च पालिकेने केला पाहिजे . कामगारांचे ATM Card व पासबुक जे ठेकेदार स्वतः कडे ठेवतात त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करून ब्लॅक लिस्ट केले पाहिजेत . सफाई कामगारांना हक्काच्या ,व बाळंतपणाच्या रजा कायद्या प्रमाणे दिल्या पाहिजेत .त्यांचे आरोग्य वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेन यांनी केलेल्या मार्गदर्शन सूचनानप्रमाणे PPE किट चा वापर करून सुरक्षित ठेवले पाहिजे .त्यांना पगाराची पावती मिळाली पाहिजे .हे काम बारमाही असल्यामुळे येथे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेवून त्यांचा रेशो ठरवून पालिका सेवेमध्ये समायोजन केले पाहिजे . कामगार कल्याण अधिकारी यांनी पालिका प्रशासन व सफाई कामगार यांचे मधील दुवा म्हणून काम केले पाहिजे .अश्या सूचना केल्या .
त्यानंतर आयोगाने सफाई कर्मचा-यांशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला, तसेच विविध संघटनांकडून व उपमहापौर यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुचनांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *