महावितरणच्या धाक-धपटशाही विरुद्ध रणरागिणी जशासतसे उत्तर देतील – डॉ. भारती चव्हाण

पिंपरीत जन आंदोलन समितीच्या वतीने महावितरणाच्या विरोधात घोषणा…

पिंपरी प्रतिनीधी
दि. 23 फेब्रुवारी 2021

महाआघाडी सरकार वीजबीलाबाबत औदार्य दाखवत आहे. परंतू हे धादांत खोटे असून कैकपट वाढीव वीजबिले देऊन हे बील न भरणा-या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. महावितरणने नेमलेले ठेकेदार गुंड वेळी अवेळी घरी येऊन कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडीत करीत आहेत. महावितरणच्या या धाक-धपटशाही विरुद्ध मानीनी फाऊंडेशनच्या रणरागिणी जशासतसे उत्तर देतील, असा इशारा जन आंदोलन समितीच्या मुख्य समन्वयक डॉ. भारती चव्हाण यांनी दिला.

मंगळवारी (23 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात महावितरणच्या विरोधात डॉ. भारती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सह समन्वयक वैजनाथ शिरसाठ, डॉ. मोहन कदम, मधुकर बच्चे, संदीप जाधव, ज्ञानेश्वर मलशेट्टी तसेच अरुणा सेलम, कल्याणी कोटूरकर, सुनिता शिंदे, सुरेखा खंडागळे, वनीता पवार, काशिनाथ साबळे, वंदना साबळे, शोभा करकशाळे, सखुबाई सोनवणे, शहेनाज नदान, निकिता मंजूळकर, शोभा चव्हाण, दौपदा सोनवणे, शांती गवळी, सुकमार कांबळे, अनिता कांबळे, प्रतिभा रणशुर, सुलोचना महाजन, रेश्मा निमकर, रमेश कुदळे, वासुदेव चव्हाण, सुरेश पवार, मिथून पवार, भाऊसाहेब घोरपडे, रामदास कुदळे, अर्चना आनंदकर आदी उपस्थित होते.

आंदोलनस्थळी महावितरण पिंपरी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश चाकुरकर आणि उपकार्यकारी अभियंता रविंद्र दराडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री आणि महावितरणच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच सहसमन्वयक मधुकर बच्चे, वैजनाथ शिरसाठ, संदीप जाधव यांनी देखील महावितरणचा निषेध करणारी भाषणे केली. सह समन्वयक डॉ. मोहन कदम, कल्याणी कोटूरकर, सुनिता शिंदे यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी संयोजन केले.

डॉ. भारती चव्हाण म्हणाल्या की, महावितरणने संपुर्ण शहरातील वीज ग्राहकांना अनियमित वाढीव बिले दिली आहेत. वीज बील न भरणा-या ग्राहकांचा वीज पुरवठा कोणत्याही पुर्वसुचनेशिवाय अन्यायकारक पणे खंडीत केला जात आहे. यासाठी महावितरणने गुंडप्रवृत्तीचे ठेकेदार नेमलेले आहेत. हे ठेकेदारांचे कर्मचारी वेळी अवेळी येऊन वीज पुरवठा खंडीत करुन नागरीकांना मनस्ताप देत आहेत. कोरोना महामारीच्या काळात ॲन्टी कोरोना टास्क फोर्स आणि मानिनी फाऊंडेशनच्या वतीने महावितरण विरुध्द ऑनलाईन तक्रारी दाखल