ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले स्मारक पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने संत गाडगे महाराजांची जयंती साजरी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

दिनांक २३ फेब्रुवारी २०२१
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक यांच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी संतोष अण्णा लोंढे स्थायी समिती अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर पुणे व भाई विशाल जाधव यांच्या वतीने गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाला सूत्रसंचालन संतोष जोगदंड अध्यक्ष विद्यार्थी समन्वय आंदोलन ,एडवोकेट चंद्रशेखर भुजबळ शहराध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ,नीरज भाऊ कडू शहराध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष, राजेंद्र साळवे वंचित बहुजन आघाडी, विजय खडके प्रहार वाहतूक आघाडी ,संदीप जाधव उपाध्यक्ष पिंपरी-चिंचवड शहर , विजू भाऊ जाधव उपाध्यक्ष भाजपा , नवनाथ कांबळे ,गिरीश वाघमारे सचिव नागरी हक्क परिषद , आनंदा कुदळे शहराध्यक्ष ओबीसी संघर्ष समिती, संत गाडगे बाबा चे विचार आजही प्रासंगिक होत आहेत समाजातील अस्वच्छता दूर करता करता माणसाच्या मनामधील रूढी परंपरा अंधश्रद्धा दूर करण्यासाठी गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले अज्ञान असणाऱ्या लोकांना शिक्षणाचे महत्त्व सांगणे, स्वच्छतेचे समाजाला शिकवण देणे, देव देवळात नसून देव माणसांमध्ये आहे अशा अनेक प्रकारे गाडगे महाराजांनी समाजातील नागरिकांना हा दिलेला संदेश आहे असे विचार मानव कांबळे अध्यक्ष नागरी सुरक्षा हक्क समिती यांनी व्यक्त केले व्यक्त केले ,या कार्यक्रमामध्ये सर्व कार्यकर्त्यांचे व मान्यवरांचे भाई विशाल जाधव बारा बलुतेदार महासंघ युवा प्रदेशाध्यक्ष यांनी आपले आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *