अजित पवार यांच्या वक्तशीरपणा मुळे प्रशासकीयअधिकार्‍यांची धावपळ । आमदार खासदारांची पळापळ…

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या वक्तशीरपणा साठी ओळखले जातात त्यामुळे अनेकदा प्रशासकीय यंत्रणांची तारांबळ उडते आज रविवारी असाच अनुभव पुण्यातील अधिकार्‍यांना आणि नेत्यांना आला
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कोरून आढावा बैठकीच्या निर्धारित वेळेच्या अर्धा तास आधीच बैठक स्थानी येऊन बसले त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची धावपळ उडाली पवार आल्याचे समजताच खासदार आमदार अधिकारी सर्वच धावत पळत बैठक स्थानी पोहोचले
उपमुख्यमंत्री अजित पवार आल्याचे समजताच जिल्हा प्रशासन पोलिस आणि पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची धावपळ उडाली दरम्यान मंत्री दिलीप वळसे पाटील सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळे पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे खासदार श्रीरंग बारणे खासदार ऍड वंदना चव्हाण आमदार सिद्धार्थ शिरोळे बळीराम तापकीर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आरोग्य प्रमुख डॉक्टर आशिष भारती यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी बैठक सुरू होण्याच्या आधी काही मिनिटे पोहोचले त्यामुळे ते उशिरा पोहोचले असे म्हणता येणार नसले तरी उपमुख्यमंत्री वेळेआधी पोचल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली