पिंपरी चिंचवड च्या स्थायीच्या अध्यक्षपदासाठी डार्क हॉर्स नितीन लांडगे होणार ?

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि २२ फेब्रुवारी २०२१
पिंपरी चिंचवड मध्ये भाजपची एकहाती सत्ता असून शहरातील दोन मातब्बर आमदार याचा निर्णय घेणार असून भोसरी की चिंचवड याकडे शहराचे लक्ष लागले आहे. खूप अटळली लावल्या जतात यावर्षी हे पद चिंचवड कडे जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असून आमदार लक्ष्मण जगताप यांचे खांदे समर्थक शत्रुघ्न काटे च अध्यक्षपदी विराजमान होणार असे वाटत असले तरी राजकारणात काहीही होऊ शकते याचा धक्का कित्येकदा या शहरातील राजकारण्यांनी पचवला आहे व त्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात शाम लांडे, फझल शेख, अगदी आताचे उदाहरण निष्ठावंत उपमहापौर कामगार नेते केशव घोळवे यांना शहरात गॉड फादर नसतानाही योग्य संधीचा वापर कसा करावा व तशी वेगाने चक्र फिरवून चर्चेत नाव नसतानाही उपमहापौर पदावर पंकजा ताई चे कार्ड वापरून विराजमान झाले. तर नामदेव ढाके यांनी सर्व तयारी केली असतानाही त्यांचे महापौर पद हुकले म्हणजे राजकारणात काहीही होऊ शकते. सध्या तरी शहरात भोसरीचे आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप व बोटावर मोजता येणारे निष्ठावंत असे तीन गट सक्रिय आहेत.
संतोष लोंढे हे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे खंदे कार्यकर्ते असून पुण्याच्या धर्तीवर जर म्हटले तर त्यांना पुन्हा संधी मिळू शकते. परंतु निवडणूक तोंडावर आलेल्या असताना असे काही होऊ शकते याची शक्यता फार कमी आहे असे राजकीय जाणकार सांगतात. भोसरी च्या आमदाराची गोची झाल्यासारखे वाटते कारण शहरात सर्वाना वाटते की स्थायी च्या या रेस मध्ये कै.अंकुशराव लांडगे ज्यांनी भाजपा शहरात रुजवली त्यांचे पुतणे निष्ठावंत रवी लांडगे व चिंचवडचे आमदार भाऊ चे खंदे शत्रुघ्न काटे यापैकीच एकाच्या गळ्यात स्थायी ची माळ पडणार असेच चित्र दिसत असले तरी पण राजकारणात काहीही होऊ शकते अतिशय शांत उच्चशिक्षित व ज्यांचे नाव कोण्हीच घेत नाही असे आमदार महेश लांडगे यांचे निकटवर्तीय हवेलीचे प्रथम आमदार ज्यांचे राजकारणात आजही आदरणाने नाव घेतले जाते ते ज्ञानेश्वर लांडगे यांचे चिरंजीव अँड नितीन लांडगे हे नाव या रेस मध्ये डॉर्क हॉर्स म्हणून येण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणावर आहे.
आता येणारा काळच सांगु शकतो की ही माळ काटे , दोन लांडगे पैकी एक की परत पुण्याचे धर्तीवर संतोष लोंढे यांच्याच गळ्यात पडते ते पाहू या. पण निवडीनंतर शहराच्या राजकारणात खूप वेगाने चक्रे फिरणार असून खऱ्या अर्थाने येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरवात होणार हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *