पालिका प्रशासन लागले कामाला कडक व दंडात्मक कारवाई ला सुरवात…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी, दि २१ फेब्रुवारी:-
पिंपरी चिंचवड शहरातील वाढता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.तथापी मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरांत आज सकाळी क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत पंधरा नागरिकांनी मास्क न वापरून उल्लंघन केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नागरीकांनी मास्क चा वापर करावा व रस्त्यावर थुंकू नये असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले होते.त्यानंतर अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी शनिवार दि २० फेब्रुवारी रोजी सर्व क्षेत्रीय अधिकारी व वैद्यकिय अधिकारी यांची बैठक घेवून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले होते.तसेच आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॅा अनिल रॅाय यांनीही तशा सूचना आरोग्य विभागास दिल्या होत्या.


रविवार दि २१ फेब्रुवारी रोजी मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरांत सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्यासह मुख्य आरोग्य निरीक्षक विजय दवाळे,आरोग्य निरीक्षक सचिन जाधव,वैभव कांचनगौडार,राजेश चटोले यांच्या पथकाने भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह तपासणी केली.नागरिकांचे प्रबोधन केले . व मास्कचा वापर न करणाऱ्या पंधरा नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.