सरकारने लोकप्रतिनिधीना कोरोना लस (corona vaccine) उपलब्ध करून द्यावी – माणिक गावडे

मंचर : सध्या सरकारमार्फत मोजक्याच लोकांना कोरोना लस (corona vaccine) दिली जाते आहे, पण सर्वांसाठी ही लस कधी उपलब्ध होणार हा सर्वसामान्य जनतेस प्रश्न पडला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येत असून रुग्णसंख्या वाढत आहे. जनतेमध्ये कोरोना काळात सतत काम करणारे लोकप्रतिनिधीना यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, सरपंच, सदस्य, पोलीसपाटील, पत्रकार यांनाही सरकारने कोरोना लस (corona vaccine) उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मंचर ग्रामपंचायत सदस्या माणिक गावडे यांनी केली.
“सरकारच्या यादीत फक्त आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्यांचा समावेश आहे. ही लस (covid 19 vaccine) फक्त सरकारच देतं आहे, म्हणजे तुम्हाला जर हा वैयक्तिकरित्या ही लस घ्यायची असेल तर ती तुमच्यासाठी बाजारात उपलब्ध नाही. या बाबत राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.