ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके
माघ महिन्यात येणार्याल गणेश जयंतीनिमित्त अष्टविनायकातील मुख्य स्थान श्री क्षेत्र ओझर नगरी श्री विघ्नहराच्या जन्म सोहळ्यासाठी सज्ज झाली होती. श्रींचा जन्मोत्सव सोहळा कोरना रोगाचे संक्रमण असल्याने शासकीय नियमांचे पालन करून श्री क्षेत्र ओझर येथे संपन्न झाल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बी.व्ही.(अण्णा) मांडे यांनी दिली. गणेश जयंती उत्सवामध्ये द्वारयात्रेला विशेष महत्त्व आहे. या पालखी सोहळ्यात गणेशभक्त व भाविक अनवाणी पायाने पालखीसोबत चालतात.पहिला पुर्वद्वार ओझर च्या पूर्व शिवेवर महालक्ष्मी मातेच्या मंदिरात लक्ष्मी-नारायण पूजा.दुसरा द्वार दक्षिण शिवेवर सरस्वती मातेच्या मंदिरात उमा –महेश पूजा व.तिसरा पश्चिमद्वार पश्चिम शिवेवर आदिमाया मंदिरात रति –कंदर्प पूजा तर चतुर्थी श्री गणेश चतुर्थी (श्री चा जन्मोत्सव ) सकाळी १०.०० ते १२.३० वा. चौथ्या –उत्तरद्वार उत्तर शिवेवर अंबेराई ओझर (जगदाळे मळा) पृथ्वी सूर्य पूजा झाल्यानंतर श्रींच्या मंदिरात दुपारी १२.४६ मी. मोरया गोसावी यांच्या पदांचे गायन करून फुलांची उधळण करून श्रींचा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला .
मंदिरात रांगोळी, स्वच्छता,श्रींच्या मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट मंदिराला विद्युत रोषणाई, मंदिरात मुख्य गाभारा प्रवेशद्वार या ठिकाणी ओझर गावचे ग्रामस्थ रोहिदास हनुमंत मांडे यांनी आकर्षक फुलांची सजावट केली.याच कालावधीत भजने,प्रवचने, ग्रंथवाचन अखंड हरीनाम सप्ताह चालू असल्याचे समजले.आज जन्मोत्सवानिम्मित सूरसंगम भजन मंडळ आळेफाटा यांचे भजन गायन झाले. आज पहाटे ठीक ५.०० वा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गणेश कवडे , श्रीराम पंडित,दशरथ मांडे,ग्रामस्थ जगन्नाथ पंडित,अशोक कुटे यांचे हस्ते श्री चा अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी सकाळी ठीक ५.०० वाजता खुले करण्यात आले. सकाळी ७.३० वा महाआरती करण्यात आली .पेढ्यांची दुकाने,हार फुले,कटलरी ही दुकाने मांडली गेली त्यामुळे प्रसन्न असे वातावरण निर्माण झाले होते. श्रींच्या जन्मोत्सवाचे किर्तन श्री गणेश महाराज वाघमारे ओझरकर यांचे झाले.अन्नदान कल्पनाताई क्षीरसागर ,काशिनाथ वामन कानडे यांनी केले .या प्रसंगी दिपक प्रभाकर कवडे व गुलाब बाबुराव कोते यांनी देणगी दिली. या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्त गणेशभाऊ बोगे ,उपाध्यक्ष राष्ट्रवादी पुणे, जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार अतुलजी बेनके , वि.स.सा.का चेअरमन सत्यशीलदादा शेरकर, काळूराम पिंजण भाजप पुणे संदीप आहोळे सरचिटणीस राष्ट्रवादी , रामभाऊ देवकर ,युवासेना उपजिल्हा प्रमुख , बेंद्रे साहेब मंत्रालय मुंबई यांची उपस्थिती होती. या जन्मोत्सवासाठी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष रंगनाथ रवळे,सचिव आनंदराव मांडे,खजिनदार किशोर कवडे, विश्वस्त गणपत कवडे,कैलास घेगडे, मंगेश मांडे,मिलिंद कवडे,कैलास मांडे,दशरथ मांडे,विजय घेगडे,अजित कवडे,श्रीराम पंडित, राजश्री कवडे यांची उपस्थिती होती.