महिलांच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार अशोक पवार

(बातमी प्रतिनिधी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक)
शिरुर ग्रामीण ग्रामपंचायत, रामलिंग महिला पतसंस्था व रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने, शिरूर रामलिंग रोड, शिक्षक कॉलनी येथील साईबाबा व संतसेना मंदिर परिसरात, शिरूर व पंचक्रोशीतील महिलांसाठी हळदीकुंकू  कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्रीबाई व जिजामाता यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन करण्यात आली.                             
रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने विशेष पुरस्कार वितरण करण्यात आले.            
यावेळी जिल्हा परिषद कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती सौ सुजाता भाभी पवार यांना शिरुर तालुका भूषण पुरस्कार, जिल्हा परिषद सदस्य श्री राजेंद्र जगदाळे पाटील यांना सामाजिक बांधिलकी पूरस्कार, तहसील कार्यालय शिरुर येथील कर्मचारी श्रीमती स्वाती शिंदे यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार संस्थेच्या अध्यक्षा सौ राणी कर्डिले, अनुजा घावटे, गौरी पवार, हिराबाई जामदार, यशोदा दसगुडे, पायल भोसले, सदस्या संगीता दसगुडे, उज्वला नेटके, नीता घावटे, दीपाली देंडगे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशीकांत दसगुडे, सरपंच नामदेव जाधव, सुजाता अशोक पवार, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, नगरसेविका, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या. यावेळी आमदार पवार यांनी महिलांच्या विकास कामासाठी कोणताही निधी कमी पडून देणार नाही व राणिताईचे काम उत्कृष्ट असून एखादे चांगले पद त्यांना देण्याचे सूतोवाच यावेळी त्यांनी आपल्या भाषणात केले. सुजाता पवार यांनीही महिलांना आश्वासन देत सांगितले की त्यांचे कोणतेही काम अडणार नाही त्यासाठी जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी मदत केली जाईल.
कार्यक्रमाला बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.                           हळदीकुंकू कार्यक्रमावेळी महिलांना वाण म्हणून डस्टबिन वाटप करण्यात आले. तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आली.
ग्रामपंचायत शिरुर ग्रामीण, रामलिंग महिला पतसंस्था यांच्या वतीने उपस्तिथ सर्वांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *