जांभोरी येथील संतोष केंगले यांची पोलिस उपनिरिक्षक पदी नियुक्ती

आंबेगाव : – ब्युरोचिफ, मोसीन काठेवाडी
आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्टयातील  जांभोरी येथील आदिवासी युवक ,संतोष केंगले आपल्या अथांग परिश्रमातून मेहनत घेवून एमपीएससी परिक्षेतून  पी.एस.आय पदी यश मिळवत,त्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यांच्या या यशात त्यांचे वडील ,भाऊ, पत्नी यांचा सहभाग आहे. वडील मुरलीधर यांच्या अपार कष्टाचे हे चीज आहे.
                 त्यांच्या यशाने जांभोरीचे ग्रामस्थ आनंदी झाले आहेत. येथील माजी सैनिक मुरलीधर रामा के़गले यांचा हा मुलगा दि. १० फ्रेबुवारी २०२१ रोजी पुणे शहर पोलिस दलात गेली १० वर्ष सेवा बजावत असताना , एम.पी एस सी परिक्षेत पास होऊन बढती मिळाल्याने ,पी. एस. आय पदी निवड झाल्याने आंबेगाव तालुक्यातील निसर्गरम्य सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये वसलेल्या  जांभोरीतील आदिवासी ग्रामस्था मध्ये आनंदांचे वातावरण पसरले आहे .
          त्यांचे मित्र या गावचे युवा नेते मारूतीदादा केंगले, माजी सरपंच मारुती केंगले, माजी सरपंच सखुबाई केंगले, ग्रामविकास फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनाजी पारधी , माजी सैनिक मुरलीधर केंगले, हनुमान सामाजिक प्रतिष्ठान तरुण मंडळ ,जांभोरी गावठाण ग्रामविकास प्रतिष्ठान ,नांदूरकीचीवाडी, जांभोरी, समस्त ग्रामस्थ जांभोरी ,या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *