नारायणगाव ते खोडद एस टी बस वेळापत्रका नुसार सोडत नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिक हैराण…

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
आंतरराष्ट्रीय जागतिक रेडिओ दुर्बीण प्रकल्प असलेल्या खोडद गावामधून नारायणगावात शिकायला येणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वेळेवर येत नसलेल्या एसटी बस अभावी गैरसोय होत आहे.
याबाबत माहिती अशी की, नारायणगाव ते खोडद व पुन्हा नारायणगाव अशी एसटी बस वेळेवर न सोडल्यामुळे हिवरे व खोडद येथील विद्यार्थी व इतर प्रवाशांची गैरसोय होत आहे.
खोडद एस टी बस नारायणगाव आगारातून संबधित वाहतुक नियंत्रक अधिकारी एस टी च्या वेळापत्रकाप्रमाणे सोडत नसल्याने शालेय विदयार्थी, शासकीय निमशासकीय कर्मचारी, महिला, शेतकरी ग्रामस्थ हैराण झाले असून खोडद एस टी बस वेळापञका प्रमाणे सोडण्यात यावी अशी मागणी खोडद ग्रामपंचायत व हिवरे तर्फे नारायणगावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन खोकराळे यांनी केली आहे.
लॉकडाऊन नंतर ही एस टी बस दिवाळी भाऊबीजेपासून सुरू झाली आहे. या बसला प्रवाशांचा प्रतिसाद देखील चांगल्या प्रकारे आहे. पण एस टी च्या अधिकार्‍यांच्या ढिसाळ नियोजनामुळे एस टी बस वेळेवर येत नाही.
पुणे येथिल एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी नारायणगाव एस टी आगारातील बस वाहतुकीच्या ढिसाळ नियोजनाची चौकशी करून नागरिकांची व शालेय विदयार्थांची होणारी गैरसोय दुरू करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.