तासगाव एसटी स्टँड ते विटा नाका वाहतूकीवर मार्ग काढणार: व्यापाऱ्यांना नोटीस काढणार- मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील

राजू थोरात तासगाव प्रतिनिधी

तासगाव शहरात काही ठिकाणी वाहतुकीची शिस्त बसवण्यात तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांना यश आले आहे. त्यासाठी तासगाव उपविभागीय पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे व तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वाहतूक पोलीस कामाला लागले आहेत.
शहरात वाहतुकीची कोंडी होत असतानाच तासगाव नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी आक्रमकपणा घेऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून मार्ग काढले.
तासगाव शहरातील हॉटेल मोहोर डीलक्स ते विटा नाका या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होती. काही व्यापारी स्वतःचा माल उतरवण्यासाठी व माल नेण्यासाठी ट्रक,टेंपो,पिकअप, छोटा हत्ती,या वाहनांचा वापर होतो.त्यावेळीच महामार्गावर वाहतूक ठप्प होते.
ह्या महामार्गावर खानापूर आटपाडी विसापूर विटा येथून ॲम्बुलन्सही रुग्णांना घेऊन सायरन वाजवत जातात परंतु विटा नाका ते हॉटेल मोहोर डिलक्स या परिसरातच वाहतूक ठप्प झालेले दिसून येते परिणामी रुग्णांना जीव गमवावा लागतो.
काही दुकानदाराकडे ग्राहक स्वताचे वाहने रस्त्यावर लावूनच दुकानात जातात.
मागील 10 दिवसापूर्वी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील हे सहकुटुंब आपल्या खाजगी गाडीतून घरी जात असताना हॉटेल मोहर डीलक्स जवळ वाहतुकी मध्ये अडकले होते. स्वतः मुख्याधिकारी गाडी मधून खाली उतरले व त्या वाहनचालकाला या महामार्गावर वाहन मध्येच का उभे केलेस अशी विचारणा केली. परंतु वाहनचालकांने हुज्जत घातली.
दोन दिवसापूर्वी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील हे नगरपालिकेच्या शासकीय वाहनाने घरी जात असताना हॉटेल मोहोर डीलक्स ते विटा नाका येथे वाहतूक ठप्प झाल्यामुळे त्यांची गाडीही वाहतुकीमध्ये अडकली.त्यावेळी मुख्याधिकारी यांनी स्वता वाहनातून खाली उतरत टेम्पो चालकाला खडे बोल सुनावले होते.
यावर आता मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी आक्रमक पणा घेतला आहे हॉटेल मोहोर डीलक्स ते विटा नाका या महामार्गावरील दोन्ही बाजूवर असलेल्या व्यापाऱ्यांना नोटीस काढून नियमावली जारी करणार आहेत. जे व्यापारी नियमाचा भंग करणार त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणार आहेत.तसेच काही वाहनधारक या महामार्गावर वाहने उभी करतात त्यांच्यावरही पोलिसांच्या मार्फत गुन्हे दाखल करणार आहेत.
मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी पुढाकार घेऊन या महामार्गावरील वाहतुकीची शिस्त बसली तर ॲम्बुलन्स मधून जाणाऱ्या रुग्णांचे प्राण वाचू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *