गावातून पहिलेच दोघे केंद्र सरकार च्या सुरक्षा दलात भरती :- ग्रामस्थांकडून सन्मान

बेल्हे दि.५ (विभागीय संपादक रामदास सांगळे) :- खडकवाडी (ता.आष्टी) येथील लक्ष्मण दशरथ सांगळे व रवींद्र लहाणू सांगळे या तरुणांची नुकतीच स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत केंद्र सरकारच्या सुरक्षा दलामध्ये भरती झाल्याने गावाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवल्याने
खडकवाडी ग्रामस्थांच्या वतीने दोघांचा सन्मान करण्यात आला.
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत लक्ष्मण सांगळे हा सेंट्रल आर्म पोलीस फोर्स (SSB) मध्ये भरती झाला. तर रवींद्र सांगळे हा सीआरपीएफ मध्ये भरती झाल्याने अतिशय दुर्गम व डोंगरी खडकवाडी गावातुन पहिलेच केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवणारे ठरले आहेत.ग्रामस्थांच्या वतीने दोघांचाही सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दोघेही शेतकरी कुटुंबातील असून अतिशय मेहनतीने व जिद्दीने अभ्यास करून या हे यश संपादन केले आहे. दोघांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा खडकवाडी येथे झाले तर माध्यमिक शिक्षण नागनाथ विद्यालय नागतळा (ता.आष्टी) येथे झाले. खडकवाडी गावच्या शेजारी असलेल्या वनवेवाडी येथील कृष्णा वणवे व नागतळा येथील अशोक कदरे या दोघांची SSB मध्ये भरती झाल्याने त्यांचा देखील खडकवाडी ग्रामस्थांनी सन्मान केला. खडकवाडी व पंचक्रोशीतील नागरिकांनी तसेच आमदार बाळासाहेब आजबे, माजी महसूल राज्यमंत्री सुरेश धस,जिल्हा परिषद सदस्या सविता गोल्हार यांनी चौघांचे अभिनंदन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *