मोदींच्या नेतृत्वाखाली आजचा अर्थसंकल्प म्हणजे देशाला नवी उभारी देणार : अमित गोरखे

पिंपरी : दि १ फेब्रुवारी २०२१
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. “जगातील सर्वच देश कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडले असताना भारताने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा निर्धार या अर्थसंकल्पात केलेला दिसून येत आहे. मरगळलेल्या सर्वच क्षेत्रांना मदतीचा हात देत, बळ पंखांना दिले हे, घे भरारी आकाक्षांची असा विश्वासच आज अर्थसंकल्पाने सर्व भारतीयांना दिला आहे,” अशा शब्दात भाजपाचे महाराष्ट्र सचिव अमित गोरखे प्रतिक्रिया व्यक्त केली.
7 नवीन मेगा टेक्स्टाईल पार्क ची घोषणा ही रोजगार निर्मिती बरोबरच कृषी क्षेत्राला उभारी देणारी आहे .लघुउद्योगांना उभारी देताना डिमांड वाढवण्यासाठी अनेक उत्पादनावरील आयात शुल्क वाढवले आहे. तसेच स्टील व आलाँय यांची भाववाढ रोखण्यासाठी आयात शुल्क कमी करून लघु उद्योगाला दिलासा दिलेला आहे, असे अमित गोरखे यांनी सांगितले.
याचबरोबर, उद्योगासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे विज डिस्ट्रीब्यूशन कंपन्यांना स्पर्धा व्हावी, या उद्देशाने दोन पेक्षा अधिक वीज वितरण कंपन्या असतील अशी योजना केली.कंपनी कायद्यातील बदलाबरोबरच ईज ऑफ डुईंग बिझनेस साठी विशेष योजना जाहीर केली . एकंदरच कोविड महामारीचे सावट असताना एकशे तीस कोटी भारतीयांना उभारी देणारा अर्थसंकल्प होय, असे मत अमित गोरखे यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले…