माळशेज प्रतिनिधि
दिपक मंडलिक
31/01/2021
आळेफाट्या कडून मुंबई च्या दिशेने चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलर ला रात्री आठ च्या दरम्यान माळशेज घाटात मोठा अपघात झाला आहे....
अपघातात
17 पैकी 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे…
भरधाव वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटून अपघात झाल्याची महामार्ग पोलिसांची माहिती रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यामुळे मोठा धोका टळला.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे…
जवळपास सतरा प्रवासी या बस मधून प्रवास करत होते चार जण जबर जखमी झाल्याची देखील माहिती मिळते…
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी आळेफाटा व मुरबाड या ठिकाणी हलवण्यात आले आहे अनेक दिवसांपासून रस्त्याच्या दुरूस्तीच्या सुरू असलेल्या कामामुळेच हाअपघात झाल्याचं बोललं जातंय
हे सर्व प्रवासी उल्हासनगर येथील असल्याचे समजतंय…