पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी प्रवास करताना रिक्षा मीटरने प्रवास करावा : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

रोहित खर्गे, विभागीय संपादक

कृष्ण प्रकाश यांनी स्वतः मीटरने रिक्षा प्रवास करून गुगल पे द्वारे रिक्षा चालकास ऑनलाइन पेमेंट केले

पिंपरी दि २१ जानेवारी
पिंपरी-चिंचवड शहरात मीटरने रिक्षा व्यवसाय सुरू व्हावा, यासाठी शहरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी संघटना यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेऊन मीटरने रिक्षा सुरू करण्याची मागणी केली होती, तसेच ऑटो क्लस्टर येथे झालेल्या राहिवाश्यांच्या बैठकीत ही हा विषय चर्चिला गेला होता तेव्हाही याबाबत कृष्ण प्रकाश यांनी वाहतूक विभागास शहरात मीटरने रिक्षा सुरू होण्या संदर्भात मीटरने रिक्षा सुरू कराव्यात असे सांगण्यात आले होते.


याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत दिसले यांनी रिक्षा संघटनाशी चर्चा करून शहरात रिक्षा मीटरने चालवण्यास कार्यवाही सुरू केली आहे, याबाबत महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन शहरात मीटर सुरु होण्या संदर्भात प्रयत्न केले आहे.

यामुळे आज दि.२१/०१/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रातराणी रिक्षा स्टँडवर रिक्षा मीटर डाऊन करुन या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.

सदर कार्यक्रमास पिंपरी चिंचवड चे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हेरीमठ, मंचक इप्पर,सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आधे, सुबोध मेडसीकर, पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे,राजेंद्र कुंटे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, आशा कांबळे, बाळासाहेब ढवळे, संजय दौडकर, धनंजय कुदळे आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश बोलताना म्हणाले आता अधुनिकरण आणि काळाच्या सुसंगत राहून रिक्षा चालकांनी स्वतः मध्ये बदल केले पाहिजे, विरोधाला विरोध न करता सकारात्मक भूमिका घेऊन बाबा कांबळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन शहरात मीटरने रिक्षा सुरू करणे संदर्भात प्रयत्न केले आहेत, प्रशासन देखील रिक्षा चालकांच्या सोबत असून शहरांमध्ये रिक्षा स्टँड वाढवणे आणि फायनान्स कंपनी कडून