जिजाऊंच्या स्फूर्ती व प्रेरणेतूनच शिवस्वराज्य साकारले – नरेंद्र बनसोडे.

रोहित खर्गे, विभागीय संपादक

(जिजाऊनां युवक काँग्रेस चे अभिवादन)

पिपरी दि. १२
स्वराज्याच्या प्रेरणा राजमाता जिजाऊं च्या ४२३ व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने भोसरी येथील शिवजिजाऊ स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जय जिजाऊ ! जय शिवराय! राजमाता जिजाऊ कि जय, छत्रपती शिवरायांचा विजय असो. असा जयजयकार व घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी अभिवादन करताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले,
“जिजाऊंच्या विचारांची कास धरून शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला व अन्यायाविरोधात जनन्यायाचे धोरण अवलबंले व यातून रयतेला मोठा आधार, सुरक्षितता व दिलासा देत स्वराज्याची संकल्पना जनमानसात रूजविली व तो इतिहास आजही आजच्या पिढीला व राजकारणाला दिशा देणारा आहे. शिवरायांची युध्दनिती व समतावादी कार्यप्रणाली ही आज जगविख्यात आहे व यासा-या अलौकिक इतिहासाला घडविणा-या जिजाऊ या ख-या अर्थाने महानमाता, प्रेरणास्त्रोत, शिवस्फूर्ती व स्वराज्यजननी ठरल्या व अजरामर झाल्या, जिजाऊंचे शिक्षण व संस्कार यावर आधारित स्वराज्याची निर्मिती करत शिवराय रयतेचे जाणते राजे ठरले”

या प्रसंगी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शहर सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, मिंलिद बनसोडे, विशाल सरवदे, रोहन वाघमारे, अनिल सोनकांबळे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, अर्णव कामठे, तेजस पाटील, हर्ष थेटे, सॅम्यूयल पिल्ले, लक्ष्मण म्हेत्रे, साजित खान, मोहम्मद मुश्ताक आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *