मुंबई पुणे महामार्गावर ग्रेड सेपरेटर मध्ये आकुर्डी येथील पँटलुन शो रूम समोर एस ती चा अपघात जीवितहानी नाही

रोहित खर्गे, विभागीय संपादक

आकुर्डी :- दि ८ जानेवरी
आकुर्डी काळभोर नगर येथे गुरुवार दि ८ जानेवारी रात्री 7.३० चे सुमारास मुंबई हुन पुणेकडे जाणाऱ्या एस टी बसला पँटलून शो रूम च्या समोर ग्रेट सेपरेटर मध्ये भीषण अपघात झाला असून, रात्री उशिरापर्यंत ट्राफिक हलवण्याचे काम पोलीस करत होते. अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून बस लाईट च्या पोलवर ग्रेट सेपरेटर चा कठडा तोडून जोरात आदळली अपघाताची भीषणता जोरात असल्याने लाईट चा पोलही जमीनदोस्त झाला. बस रस्त्यात आडवी झाली . रात्री रिमझिम पाऊस व लाईट यामुळे ड्रायव्हरला अंदाज आला नसावा असे तेथे असणाऱ्या नागरीकांकडून समजले. बस रस्त्यात आडवी झाल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. व एक तास वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाली होती. तेथे उभे असलेल्या पोलिसांकडे माहिती विचारली असता सांगण्यास टाळाटाळ केली.


काही स्वयंसेवक पुढे येऊन वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले. बघ्यांच्या गर्दीमुळे ही वाहतूक सुरळीत करण्यास पोलिसांना त्रास होत होता. त्यात रिमझिम पाऊस सुरू असल्याने वाहतूक कोंडी वाढत होती.


एक तासानंतर पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यास यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *