जुन्नर तालुका मित्र मंडळाचा पर्यटन दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा मोठया उत्साहात संपन्न

रोहित खर्गे, विभागीय संपादक

भोसरी :- दि ८ जानेवारी

जुन्नर तालुका मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने पर्यटन दिनदर्शिके चा प्रकाशन सोहळा व कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या वैद्यकिय सेवक,व सामाजीक व्यक्तीमत्वांचा कोरोनायोद्धा पुरस्कार वितरण सोहळा राजमाता जिजाऊ महाविद्यालय भोसरी येथे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते घेण्यात आला.


यशवंतराव चव्हाण रूगणालयातील कोविड वैद्यकिय अधिकारी डाॅ. विनायक पाटील, रूबी अलकेअर कोविड अतिदक्षता विभागप्रमुख डाॅ. अाश्विनी कदम,सामाजीक कार्यकर्ते आण्णासाहेब मटाले, आपला आवाज चे पुणे विभागीय संपादक रोहित खर्गे, राजाभाऊ पायमोडेे व कोरोना काळात कोरोना रुग्णांना प्लाझ्मा व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देणारे मंडळाचे कार्यकर्ते दिपक सोनवणे यांना कोविडयोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पर्यटन दिनदर्शिकेत जुन्नरची रामायणकाळा पासूनची माहिती लिहीणारे अभ्यासक आर.एस.पंडीत सर यांचाही या वेळी खासदारांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.


यावेळी भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी मंडळाविषयी कृतदनता वेक्त केली. व म्हणाले हे मंडळ माझेबरोबर सतत असून मला मोलाची साथ यांची असते. त्यामुळे आपले ही काही देणे लागते त्यामुळे प्राधिकरण कार्यालयातून या मंडळासाठी हॉस्टेल च्या कामासाठी भूखंड देण्यात यावे अशी मागणी खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडे केली व खासदार साहेब या कामासाठी आपण ही पाठपुरावा करावे असे सांगितले.

अमोल कोल्हे यांनी जुन्नर तालुका मित्र मंडळाचे हॉस्टेल हे बारामती होस्टेलच्या धर्तीवर असेल व त्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू तसेच पिंपरी चिंचवड मध्ये राहणारे जुन्नरवासीयांच्या एकत्र स्नेहमेळा घेण्यात यावा असे त्यांनी सुचविले . यशवंतराव चव्हाण रुग्णालयात कोविड वॉर्डात काम करणारे डॉ विनायक पाटील व त्यांच्या टीमच्या कामाचे कौतुक केले व म्हणाले कोरोना अगदी घरापर्यंत आला आमचे मित्र रोहित खर्गे यांना कोरोना झाला तेव्हा त्यांना व शहरातील इतर रुग्णांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न तुम्ही केले याबद्दल आम्ही आपले नेहमी ऋणी राहू. असेच काम करत राहावे असेही सांगितले.

या मंडळाकडून मलाही मोलाची साथ मिळाली याबद्दल मी नेहमीच आपला आभारी आहे. मी माझ्या याकाळात रस्त्याच्या कामावेतिरिक्त लवकरच रेल्वे आराखडा आणून पुणे नाशिक रेल्वेचे काम सुरू करणे हा माझा संकल्प आहे. तसेच तालुक्याच्या विकासासाठी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करत राहणार. तसेच सर्व उपस्थितीत नागरिकांना नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या .


याप्रसंगी भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे, राष्ट्रवादि काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कामगार नेते अरूण बोऱ्हाडे, उत्तम आल्हाट,यश दत्ताकाका साने, निलेश जाधव, जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे व कार्यकारिणी सदस्य व सभासद उपस्थित होते.

मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष प्रभाकर ढोमसे यांनी केले प्रास्तविक ऍड संतोष काशिद, यांनी मंडळाचा कार्यअहवाल तर सुत्रसंचालन नवनाथ नलावडे यांनी केले. संयोजन योगेश आमले,उल्हास पानसरे, मिननाथ सोनवणे, ऍड महेश गोसावी, इंद्रजित पाटोळे, श्वेता पाटे , सल्लागार उत्तम महाकाळ, शिवाजी चाळक, भाऊसाहेब कोकाटे, विजय ढगे, अमोल बांगर,नितीन शिंदे. सुनील पाटे. निलेश बोरचटे यांनी विशेष परिश्रम घेतले.सर्व पुरस्कार्थींच्या वतीने आभार दिपक सोनवणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *