पुणे व अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण ला यश

दि. 14/12/2020 रोजी आळेफाटा पोलीस स्टेशन गु. र.नं. 430/2020 भा.द.वि कलम 395 नुसार गुन्हा दाखल झाला होता सदर च्या गुन्हयाचे स्वरूप लक्षात घेता ह्या गुन्ह्यातील आरोपींचा त्वरित शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना मा पोलिस अधीक्षक सो यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.

वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींची माहिती घेण्यासाठी आळेफाटा,पारनेर,निघोज,साकोरी या भागात शोध सुरू केला असता बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की शिरूर पोलीस स्टेशन गु. र. नं.748/2019 भा.द.वी कलम 395 मधील फरार आरोपी नामे विशाल उर्फ कोंग्या काळे हा टाकळी हाजी परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार निघोज बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून थांबलो असता दोन इसम निघोज बाजूकडे जाताना दिसले त्यांना आमचा संशय आल्याने ते पळून जाऊ लागले सदर इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता 1) विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे वय 26 वर्षे रा. निघोज ता.पारनेर जि. अ.नगर 2)दिपक उर्फ आशिक आझाद काळे वय 25 वर्षे रा. निघोज ता. पारनेर जि.अ नगर असे असल्याचे सांगितले.त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मागील चार पाच महिन्यात ओतूर, आळेफाटा, मंचर लोणीकंद, पारनेर या भागात त्यांचे इतर साथीदारांन सोबत गुन्हे केल्याचे कबूल केले.


त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित पोलीस स्टेशन कडून माहिती घेतली असता त्यांनी खालील पोलीस स्टेशन च्या हद्दीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
1) आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं.430/2020 भा.द.वी.कलम 395
2) आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं.426/2020 भा.द.वी.कलम 394,34
3) ओतूर पोलीस स्टेशन गु.र.नं.233/2020 भा.द.वी.कलम 457,380
4) मंचर पोलीस स्टेशन गु.र.नं.688/2020 भा.द.वी.कलम 394,34
5) लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं.1007/2020 भा.द.वी.कलम 380
6) पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं.111/2020 भा.द.वी.कलम 457,380
7 )बेलवंडी पोलीस स्टेशन गु.र.नं.594/2020 भा.द.वी.कलम 394
8 )शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं.748/2019 भा.द.वी.कलम 395
सदर ची कार्यवाही मा पोलीस अधीक्षक सो श्री अभिनव देशमुख सो., अप्पर पोलीस अधीक्षक श्री विवेक पाटील सो., उप. विभा. पो.अधिकारी. मंदार जवळे सो. यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट सो. यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नेताजी गंधारे, सफो.दत्तात्रय गिरमकर, पोहवा. हनुमंत पासलकर, पोहवा. उमाकांत कुंजीर, पोहवा.विक्रम तापकीर, पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. काशीनाथ राजापूरे, पोना.दिपक साबळे, पोना. जनार्दन शेळके, पोना. राजू मोमीन, पोना. अजित भुजबळ, पोना. मंगेश थीगळे, पोशी.संदीप वारे, पोशी. अक्षय नवले, पोशी. निलेश सुपेकर, पोशी.अक्षय जावळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *