🌴☘️🌴☘️🌴
रोहित खर्गे, विभागीय संपादक
अकोले :- निसर्गाची आणि सामाजिक आवड असली की सामजिक कामे हातून घडली जातात याचेच उदाहरण म्हणजे कळसुबाई परिसरात अंघोळीच्या गोळीचे व खिळेमुक्त झाडांचे काम करणारे सहकारी प्रा.नामदेव बांगर(राष्ट्रीय सेवा योजना) यांच्या माध्यमातून ट्रेक च्या परतीच्या मार्गावर पिंपरी चिंचवड येथील पर्यावरणावर व पवनामाई स्वच्छ करण्याचे व्रत हाती घेतलेले तरुण ट्रेकिंग साठी 31 डिसेंबर च्या चंगळवादी संस्कृती पेक्षा निसर्ग संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचे धडे तरुणाई ला मिळावेत यासाठी रोटरी क्लब वाल्हेकर वाडी ने ट्रेक आयोजित केला.
यावेळी परतीच्या प्रवासात कळसुबाई शिखरावर गोकर्ण च्या बिया ट्रेकर्सना देण्यात आल्या. आणि त्या जाता जाता शिखरावर रुजवायच्या हे आवाहन देखील करण्यात आले. तसेच वृक्ष जोपासनेची आवड तरुणांना लागावी यासाठी सहभागी ट्रेकर्स च्या हस्ते कला व वाणिज्य महाविद्यालय शेंडी ता अकोले येथे अंघोळीच्या गोळीच्या वतीने वृक्षरोपन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडीच्या वतीने सर्वात जास्त वयस्कर ट्रेकर्सला आणि सर्वात लहान ट्रेकर यांचा कळसुबाई शिखर सर केल्याबाबद्दल सन्मान करण्यात आला. ट्रेकिंग करून परत येत असताना शेंडी, अकोले येथील कला वाणिज्य महाविद्यालयात ट्रेक मधील सहभागी असलेल्या ४१ सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचा योग या नुसर्गप्रेमी तरुणांनी घडवून आणला. यावेळी या उपक्रमात प्रा.अर्चना बच्छाव,प्रा.अनिल डगळे, प्रा.नईम खाटीक, आकाश संगारे, विकास सुकटे , दिनेश वाघमारे, सुनिल भांगरे, सुरेश बांडे आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लब वाल्हेकरवाडी चे अध्यक्ष सचिन काळभोर, सेक्रेटरी सचिन खोले, रोटरी क्लब डायरेक्टर सौ. वनिता सावंत, रो. संतोष वाघ सोबत इतर सदस्य उपस्थित होते.