आळे गावात १०० पैकी १७ पॉझिटिव्ह

जुन्नर (वार्ताहर):- आळे येथील संशयित १०० नागरिकांची करोना तपासणी करण्यात आली.त्यापैकी १७ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं.

जुन्नर तालुक्यात सातत्याने रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग गावोगावी आरोग्य मोहीम राबवत आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जुन्नर तालुका मार्फत उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग मंचर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार (दि.१०) रोजी आळे (ता.जुन्नर) १११ पथकांनी गावात घरोघरी जाऊन सर्वेक्ष केले. नागरिकांची आॅक्सिजन लेवल, पल्स, थर्मल स्क्रिनींग करण्यात आले.

आळे (ता.जुन्नर) नारीकांची तपासणी करताना कर्मचारी

दिवसभरात आढळलेल्या १०० संशयित रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यासाठी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. यामध्ये १०० संशयित व्यक्ती पैकी १७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. या व्यक्तींना लेण्याद्री येथील कोविडं सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तरीही पूर्ण गावचे सर्वेक्षण झाले नसून पुढच्या टप्प्यात उर्वरित नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या कामी १११ पथके,११ पर्यवेक्षक, २ अँटीजेन स्वब कलेक्शन सेंटर,२ टेस्टिंग टीम, २ ॲम्बुलन्स, आरोग्य कर्मचारी, २० स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.

आळे (ता.जुन्नर) नारीकांची तपासणी करताना कर्मचारी

या वेळी तहसीलदार हनुमंत कोळेकर,आरोग्य अधिकारी डॉ.उमेश गोडे, आरोग्य विभागाचे कर्मचारी,बीडीओ हेमंत गरीबे,सभापती विशाल तांबे,पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, गावचे तलाठी, ग्रामसेवक, स्वयंसेवक, तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

सर्वांनीच स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासन केले.