कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि.११ रोजी एकाच दिवशी घोडेगाव येथे सर्वेक्षण
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि.११ रोजी एकाच दिवशी घोडेगाव येथे सर्वेक्षण मोहीम राबवणार : – तहसीलदार रमा जोशी यांची माहिती
प्रतिनिधी मोसीन काठेवाडी
मा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांचे निर्देशानुसार, आंबेगाव तालुक्यातील मौजे घोडेगाव येथील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधीत रूग्णांचा वाढता आलेख नियंत्रीत करणेसाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तालुका आंबेगाव तर्फे मा. इंसिडेंट कंमाडर तथा उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग मंचर यांचे मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक ११ /९ / २०२० रोजी एका दिवशी सर्वेक्षण मोहीम करण्यात येणार आहे.

सदर दिवशी ४५ पथके प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करणार आहेत. त्याचदिवशी संशयित रूग्णांची रॅपिड अँटिजेन्ट टेस्ट एकूण ३ सेंटर ठिकाणी होणार आहे. याकामी ९ पर्यवेक्षक, ३ अँटिजेन्ट स्वॅब्स कलेक्शन सेंटर , ३टेस्टींग टिम, १५ टेस्टींग स्टाफ, १० पोलिस कर्मचारी वर्ग , ३ अँब्युलन्स, अतिरिक्त २२ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे .
यासाठी स्वयंसेवक यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच खाजगी लॅब्स यांचे सहकार्य मिळणार आहे.
सबब घोडेगाव शहरातील सर्व नागरिकांनी यावेळी पथकाला खरी माहिती द्यावी. १००% व्यक्तींनी घरी थांबावे.

सर्वेक्षण पथकाचे सूचनेवरुन तात्काळ सांगितलेल्या स्वॅब्स कलेक्शनस् आणि टेस्टींग सेंटर ठिकाणी टेस्टिंग करून घ्यावे. पुढील अहवाल प्राप्त होताच सूचनेनुसार सी.सी.सी / डी.सी.एच सी मध्ये दाखल करण्यात येईल. याकामी सदर सर्वेक्षण मोहीमेस सर्व घोडेगाव नागरिकांनी सहकार्य करावे असे अवाहन आंबेगाव तालुक्याचे तहसील रमा जोशी यांनी केले आहे.
याबाबत उद्या सकाळी १२ वाजता ग्रामपंचायत घोडेगाव येथे सन्माननीय सदस्य यांची बैठक घेतली जाणार आहे.