जुन्नर तालुक्यात आजपर्यंत १५७९ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८६९ रुग्ण उपचार घेऊन परतले घरी
तालुक्यात आज एकूण ९२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
नारायणगाव (किरण वाजगे,कार्यकारी संपादक)
जुन्नर तालुक्यात आज ९२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आजपर्यंत आढळलेल्या एकूण १५७९ रुग्णांपैकी ८६९ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.
ओतूर व नारायणगाव येथे प्रत्येकी १६ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून बल्लाळवाडी येथे सात, बेल्हे येथे पाच, उंब्रज नंबर १, सावरगाव, येणेरे व जुन्नर येथे प्रत्येकी चार, शिरोली बुद्रुक, गुंजाळवाडी, बेल्हे, पिंपळवंडी, तेजेवाडी येथे प्रत्येकी तीन, आर्वी – पिंपळगाव, हिवरे बुद्रुक, राजुरी येथे प्रत्येकी दोन, मंगरूळ, गोळेगाव, हापुस बाग, बेलसर, गुळुंचवाडी, अलदरे, वडगाव आनंद, निरगुडे, गुंजाळवाडी – आर्वी, खोडद, डिंगोरे, आर्वी, आणे, निमगाव तर्फे म्हाळुंगी येथे प्रत्येकी एक कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
आज कोरोनामुळे निमगाव सावा, उदापूर व आर्वी येथे प्रत्येकी एक अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.
दिवसेंदिवस वाढत्या कोरोणा रुग्णांमुळे जुन्नर तालुक्यांमध्ये निश्चितपणे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे गरजेचे असून योग्य कारणासाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे गेल्या आठ दिवसात ५०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जुन्नर तालुक्यात निष्पन्न झाल्यामुळे व एकूण दीड हजार पेक्षा जास्त रुग्ण संख्या झाल्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यात आज पर्यंत १५७९ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. यातील सुमारे ८६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ६४४ अँक्टीव रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण ६६ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उदय गोडे व वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.