जुन्नर (वार्ताहर):- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात कांदा लागवडीला सुरवात झाली असून शेतकऱ्यांना रोप मिळेनासे झाले असून कांद्याचं रोप दुपटीने महाग झालं आहे.
करोनामुळे शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता.परंतु जेव्हा कांद्याला बाजारभाव वाढला तेव्हा साठवुन ठेवलेला कांदा पुर्णपने सडला होता हा कांदा फेकुन दयायची वेळ शेतकऱ्यांवर आली होती.तरी यामधुन सावरुन शेतकऱ्यांनी या वर्षी लागवडीला सुरवात केली आहे.परंतु कांदा रोप २० ते २२ हजार रुपये एकर मिळत आहे.एरव्ही १० ते १२ हजार रुपये मिळणारे रोप पावसामुळे शेतकऱ्यांना दुपटीने विकत घ्यावे लागत आहे.
विशेष करुन तालुक्याच्या पुर्व भागातील राजुरी, जाधववाडी, बोरी, साळवाडी भोरवाडी, शिरोली, सुलतानपुर, वडगाव, कांदळी, चाळकवाडी, उंचखडक, या गावांमध्ये मोठया प्रमाणात कांद्याच्या लागवडी होत असतात याही वर्षी लागवडीला सुरवात झालेली आहे.परंतु बहुतेक शेतकरी बेड पध्दतीने लागवडी करताना दिसुन येत आहे कारण बेड पध्दतीने लागवडी केल्यास पिकाला पाणी पण कमी द्यावे लागते व ते भरावे पण लागत नाही याला फक्त ठिबक सिंचनचा वापर करावा लागतो.शिवाय कमी व प्रमाणात पाणी दिल्याने कांदा देखील चांगला येतो आहे.तर सारा पध्दतीने लागवड केल्यास सा-यात जास्त पाणी साचल्याने कांदा फुगतही नाही व जास्त पाण्यामुळे कांदेही खराब होतात यामुळे शेतकऱ्यांचा बेड पध्दतीने लागवड करण्याकडे कल वाढला आहे.
गेल्या दोन महीण्यांपासुन वातावरणात होणाऱ्या हवामानामुळे व सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी टाकलेली कांद्याची रोपे सडुन गेलेली असल्यामुळे कांद्यांच्या रोपांंचे भाव देखील गगणाला भिडलेले आहे.