महवितरणच्या डि.पी. मध्ये स्फोट होऊन कोतवाल कुटुंबातील सदस्यांचा हकनाक बळी

बातमीदार : रोहित खर्गे पुणे विभागीय संपादक

भोसरी दि ७ सप्टें 20, इंद्रायणीनगर येथील दुर्घटनेतील पीडितांना नुकसानभरपाई न दिल्यास आणि भोसरी परिसरातील विद्युत डीपी ना संरक्षण आवरण न बसवल्यास शिवसेना पद्धतीने आंदोलन केले जाईल शिवसेना पुणे जिल्हा ऊपजिल्हाप्रमुख निलेश मुटके चा महावितरण ला इशारा

  भोसरी येथील इंद्रायणी नगर भागात महवितरणच्या डि.पी. मध्ये स्फोट होऊन कोतवाल कुटुंबातील सदस्यांचा हकनाक बळी गेला. ज्यामध्ये दोन महिला व लहान बाळाचा समावेश आहे. महावितरणच्या नागरीवस्तीत झालेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाच्या मुख्य अभियंता श्री गवारे यांना निवेदन देऊन कोतवाल परिवाराला नुकसान भरपाई देण्याची व संपूर्ण भोसरी विधानसभा क्षेत्रातील असुरक्षित ठिकाणे सुरक्षित करण्याची मागणी केली. तसेच या गंभीर प्रकरणाची दखल वेळेत न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

यावेळी त्यांच्या समवेत युवा सेना जिल्हा युवा अधिकारी श्री सुरज लांडगे, विभाग प्रमुख श्री विश्वनाथ टेमगिरे, रामदास गाढवे, उपविभाग प्रमुख श्री संदीप टोके,श्री संतोष वरे, श्री दीपक सोनवणे ,श्री संभाजी शिंदे, श्री मुळे व इतर शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *