बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत ६३ बाधित
जुन्नर (वार्ताहर):- बेल्हे (ता.जुन्नर) प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत आजपर्यंत एकूण ६३ रुग्ण बाधित झाले आहेत. त्यापैकी ४९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून सध्या ९ रुग्ण उपचार घेत आहेत.तर आजपर्यंत ५ रुग्णांचा कोरोनाने जीव घेतला आहे.
प्रशासनाने बेल्हे गाव बंद केल्यामुळे वाढती रुग्ण संख्या कमी करण्यास प्रशासनाला यश आलं आहे. बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस. बी.थोरात व सर्व आरोग्य कर्मचारी यांचं कोरोनाच्या लढ्यात कौतुकास्पद काम आहे.नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी नेहमीच तत्पर असतात.नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावे तसेच मास्क,व सॅनिटायझर चा नियमित वापर करावा.हॉटेलमध्ये व दुकानात गर्दी करू नये.असे आवाहन डॉ.थोरात यांनी सर्व जनतेला केले आहे.प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जानेवारी पासून सुरू असलेला कोरोनाशी लढा लवकरच आपण जिंकू असा विश्वास दिला.

तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने दिवसेंदिवस जुन्नरकरांमध्ये निश्चितपणे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे गरजेचे असून योग्य कारणासाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.