जुन्नर तालुक्यात आजपर्यंत १४१३ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७८४ रुग्ण उपचार घेऊन परतले घरी
तालुक्यात आज एकूण ६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
नारायणगाव (किरण वाजगे,कार्यकारी संपादक)
जुन्नर तालुक्यात आज ६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आजपर्यंत आढळलेल्या एकूण १४१३ रुग्णांपैकी ७८४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.
नारायणगाव व ओतूर येथे आज प्रत्येकी १६ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून शिरोली बुद्रुक येथे सात, आळे येथे चार, वारूळवाडी येथे तीन, डिंगोरे व जुन्नर येथे प्रत्येकी दोन, बल्लाळवाडी, उंब्रज नं. २, पिंपळवंडी, हिवरे बुद्रुक, खोडद, बारव, धामणखेल, कुरण , सावरगाव, गुळुंचवाडी, बेल्हे येथे प्रत्येकी एक कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
आज कोरोनामुळे ओतूर व शिरोली बुद्रुक येथील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.
दिवसेंदिवस वाढत्या कोरोणा रुग्णांमुळे जुन्नर तालुक्यांमध्ये निश्चितपणे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे गरजेचे असून योग्य कारणासाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसात सुमारे २०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जुन्नर तालुक्यात निष्पन्न झाल्यामुळे व एक हजार चारशे पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात आज पर्यंत १४१३ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. यातील सुमारे ७८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ५६९ अँक्टीव रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण ६१ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उदय गोडे व वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.