केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लागणाऱ्या कागदपत्रांसाठी सुविधा केंद्राकडून अवास्तव रकमेची मागणी केल्यास पालिकेला कळवा

बातमीदार रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी (दि 4 सप्टेंबर 2020)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना म.न.पा.च्या विविध सेवा सुविधा विहित कालावधी मध्ये त्यांचे जवळच्या ठिकाणी उपलब्ध होतील या दृष्टीने नागरी सुविधा केंद्र कार्यरत आहेत. सदर केंद्रामध्ये नागरिकांना दाखल्यांचे अर्ज स्विकृतीची सोय केली आहे.

सद्यस्थितीत केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना तसेच केंद्रशासनाचे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अर्ज सादर केलेल्या अर्जदारांचे डीमांड ड्राफ्ट व त्या अनुषंगीक कागदपत्रांची स्विकृती नागरी सुविधा केंद्रामध्ये करणेत येत आहे. त्याअनुषंगाने खालील बाबी नागरिकांच्या निदर्शनास आणून देणेकामी सदर निवेदन मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटीलवार यांच्याकडून प्रसिध्द करणेत येत आहे.

१ केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत नागरी सुविधा केंद्रामार्फत अर्ज भरून घेण्यात येत आहेत त्याकामी जास्तीत जास्त र.रू.५०/- आकारणेस मान्यता देणेत आलेली आहे.

२. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जमा होणाऱ्या डिमांड ड्राफ्ट व त्या अनुषंगिक कागदपत्रांसाठी नागरिकांनी र.रू.५,०००/- डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त कोणतीही ज्यादा रक्कम कोणत्याही नागरी सुविधा केंद्र चालकास देऊ नये तसेच केंद्रचालकाने नागरिकांकडून डी.डी. व्यतिरिक्त
इतर कोणत्याही रक्कमेची मागणी करू नये.

३. तसेच केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत या पुर्वी अर्ज केलेल्या नागरिकांनी डिमांड ड्राफ्ट नागरी सुविधा केंद्रामध्ये जमा करावयाचा आहे. तथापि, सदर योजने साठी नव्याने अर्ज सादर करित असलेले नागरीक सदर अर्ज कोणत्या ही ठिकाणी, Cyber café अथवा इतर ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात या साठी नागरी सुविधा केंद्रामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. मात्र अर्ज भरल्यानंतर डीमांड ड्राफ्ट व त्या अनुषंगिक कागदपत्रे नागरी सुविधा केंद्रामध्ये जमा करावयाचे आहेत.

४. म.न.पा. च्या इतर सेवांसाठी पुर्वी प्रमाणेच प्रती अर्ज र.रू.२०/- नागरी सुविधा केंद्रचालकांना आकारणेस मान्यता देणत आलेली आहे.

उपरोक्त बाबींची सर्व नागरिकांनी नोंद घेवून कोणत्याही नागरी सुविधा केंद्रचालकाने जादा रक्कमेची मागणी केल्यास लेखी तक्रार नागरी सुविधा केंद्र मुख्य कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी – ४११०१८ येथे करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *