बातमी – रोहित खर्गे (विभागीय संपादक )
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार पिंपरी-चिंचवड महापालिकेत दाखल झाले.ते शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.त्यांनी वॉर रूमला भेट दिली.
त्यावेळीआयुक्त श्रावण हार्डीकर यांनी कोरोना विषयी शहरातील माहिती दिली. यावेळी महापौर माई उर्फ उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ वैशाली घोडेकर, आरोग्य अधिकारी पवन साळवे, उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्या 50 हजार पार झाली आहे. दररोज एक हजाराच्या पुढे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.