पत्रकार पांडुरंग रायकर कुटुंबियांना राज्यसरकारने पन्नास लाखांची आर्थिक मदत द्यावी

बातमी प्रतिनिधी
पवन गाडेकर(निवासी संपादक)

पत्रकार पांडुरंग रायकर कुटुंबियांना राज्यसरकारने पन्नास लाखांची आर्थिक मदत द्यावी – अतुलसिंह परदेशी अध्यक्ष पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकार बांधवाना शहीद म्हणून सन्मानित करा

पुणे येथील TV9 चे प्रतिनिधी पत्रकार पांडुरंग रायकर यांचे 2 सप्टेंबर रोजी पुणे येथे कोरोना ने निधन झाले.
वैद्यकीय सेवेतील गलथान कारभार आणि हतबल प्रशासन यामुळेच 42 वर्षीय तरूण व अभ्यासू पत्रकारास आपला जीव गमवावा लागला आहे.

अशातच घरातील करता पुरूष गमावल्यामुळे रायकर कुटुंबियांना राज्य सरकारने पन्नास लाख रूपयांची आर्थिक मदत करावी तसेच पांडुरंग रायकर यांना शहीद म्हणून सन्मानित करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष अतुलसिंह परदेशी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे…

जगभर कोरानाने थैमान घालत अनेकांचा जीव घेतला. या संपूर्ण घडामोडींचे वार्तांकन करत अनेक पत्रकारांनी स्वताच्या जीवाचा विचार न करता बातमीदारी केली आणि यात अनेक पत्रकार हे कोवीड पॉझिटीव्ह ही अढळले.

जीवावर बेतून पत्रकारीता करणा-या पत्रकारांना शासनाने कधीच कोणतीच ठोस मदत जाहीर केली नाही किंवा रूग्णालयात राखीव बेड ठेवले नाही.अशा परिस्थितीत अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला आहे. भविष्यात अशा घटनांबद्दल राज्यसरकारने गांभीर्याने विचार करायची गरज आहे आणि पत्रकार बांधवाना कोवीड योद्धा म्हणून रूग्णालयात बेड आरक्षीत करत चांगल्या वैद्यकीय सेवा दिल्या पाहिजे तसेच दुर्दैवाने जर कोवीड आजारात पत्रकाराचे निधन झाले तर त्याच्या कुटुंबियांना पन्नास लाखांची मदत करून त्यास शहीद म्हणून सन्मानित करावे असे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे…