नाना काटे यांनी दिला विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा

बातमी प्रतिनिधी
रोहीत खर्गे (विभागीय संपादक)

राष्ट्रवादी काँग्रेस कडून कुणाला मिळणार विरोधी पक्षनेते पदाची संधी

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज ( बुधवारी ) विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे . महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे त्यांनी स्वीय सहाय्यकामार्फत आपला राजीनामा दिला आहे . .

प्रत्येकी एक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे . 1 ऑगस्ट 2019 रोजी विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारलेल्या नाना काटे यांचा वर्षांचा कार्यकाल 1 ऑगस्ट 2020 रोजी संपुष्टात आला आहे . त्यामुळे पक्षाच्या ठरलेल्या अलिखित नियमानुसार काटे यांनी राजीनामा दिला आहे .

काटे यांना कोरोनाची लागण झाली आहे . त्यामुळे स्वीय सहाय्यकामार्फत त्यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *