पुणे – टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे पुण्यातील प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे आज बुधवार (दि.२) पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे.
त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पांडुरंग रायकर हे अतिशय अभ्यासू पत्रकार होते. पुण्यातील अनेक समस्या त्यांनी मांडल्या होत्या. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आपला आवाज न्युज नेटवर्कच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली💐💐💐💐