कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा पोलिसांची धडक कारवाई. : तिनशे चौदा जणांवर केली कारवाई
बातमी प्रतिनिधी-कैलास बोडके,
आळेफाटा -आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण तीनशे चौतीस जणांवर कारवाई केली असूूून या पुढील काळातही ही कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती आळेफाटा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी दिली.
सध्या जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहे तालुक्यातील रुग्ण संख्या एक हजाराच्यावर गेली आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाकडून वारंवार आवहान करण्यात येत आहे असे असताना नागरीकांकडून सोशल डिस्टंन्सचे पालन न करणे मास्क न वापरणे दुकाने सुरु ठेवणे या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी आपत्ती व व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन धडक कारवाई सुरु केली त्यामध्ये मास्क न वापरणाऱ्या एकशे एकोनतीस जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर सोशल डिस्टंन्स न पाळल्याप्रकरणी एकशे पाच जणांवर तर कोरोनाच्या काळात आपत्ती व व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करुन दुकाने सुरु ठेवल्याप्रकरणी आळेफाटा येथील दहा व्यवसायीकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास यापुढील काळातही अशाच प्रकारे धडक कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे असल्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी सांगितले.