दिलासादायक…बेल्हे गाव राहिला केवळ एक ऍक्टिव्ह रुग्ण

बेल्हे दि.१५ (विभागीय संपादक रामदास सांगळे:-):-बेल्हे (ता.जुन्नर) येथे एकूण २१ करोना बाधीत रुग्ण आढळले होते. त्यापैकीच केवळ १ रुग्ण ऍक्टिव्ह  राहिला असून उपचारा दरम्यान १९ रुग्ण बरे झाले तर १ रुग्ण मृत झाला आहे.अशी माहिती बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस. बी.थोरात यांनी दिली.

गावात साधारण (दि.१३) जुलै रोजी करोनाचा पहीला रूग्न आढळला होता.प्रशासनाने महीनाभरात गावात प्रतिबंधात्मक कारवाई केली.प्रशासनाने खबरदारी म्हणून (दि.१६) जुलै पासुन संपुर्ण गाव सील केले होते.यामुळे करोनाची वाढती साखळी तोडण्यास प्रशासनाला यश आले.सध्या गावात केवळ एकच रूग्न अक्टीव आहे तर त्या रूग्णाच्या घरातील सर्व व्यक्ती चा अहवाल शनिवार (दि.१५) रोजी निगेटीव्ह आल्याने ही बाब सुध्दा बेल्हेकरांसाठी दिलासादायकच आहे.

तर सदर एक रूग्न पुणे येथील ससुन रूग्नालयात उपचार घेत असून लवकेच तो ही बरा व्हावा अशी ग्रामस्थांनी प्रार्थना केली आहे. नागरिकांना आरोग्य सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. बी. थोरात व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेल्हे ग्रामस्थांनी  आभार मानले.