नारायणगाव पोलीसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा ए टी एम फोडण्याचा प्रयत्न फसला

दोन चोरट्यांना रंगेहात पकडले

नारायणगाव (किरण वाजगे,कार्यकारी संपादक)
बुधवार दि ३० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नारायणगाव बस स्थानका समोरील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्नात असलेल्या दोन चोरट्यांना नारायणगाव पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डि के गुंड यांनी दिली. 

नारायणगाव येथे काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक महामार्गावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन ची चोरी करत असताना पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना तेथून पळ काढावा लागला त्यामुळे एटीएम मधील रक्कम सुरक्षित राहिली.

सध्या पुणे जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी ए.टी.एम. चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे  हद्दीमधील रात्र गस्त अधिकारी कर्मचारी यांनी जास्त लक्ष हे ए.टी.एम.व बंद फ्लॅट मध्ये चोरी होवू नये या वर ठेवण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी याबबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंघाने दि.३०/१२/२०२० चे सेक्टर आधिकारी पो. उपनिरीक्षक हिंगे,  पोलीस नाईक दिनेश साबळे , पो.नाईक शेख, होमगार्ड ठोबळे, सातपुते, पठाण, ताजणे असे रात्र गस्त व ए.टी.एम चेक करत होते. यावेळी होमगार्ड ठोबळे, पठाण यांना एस.बी.आय.ए.टी.एम मध्ये दोन इसम एटीएम मशीन चे शटर अर्धे लावून आतमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी लागलीच प्रसंगावधान राखून होमगार्ड ठोबळे व पठाण यांनी शटर खाली ओढुन बंद केले. त्याच दरम्यान आतील इसमाने त्याच्या जवळील लोखडी टॉमी ने होमगार्ड ठोबळे यांच्या हातावर मारून दुखापत केली.

याबाबत  सहाय्यक पो.निरीक्षक दत्तात्रय गुंड यांना माहिती देऊन लागलीच पो. उपनिरीक्षक हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे,पो.ना. लोंढे, पो.ना. शेख, पो.ना.