शिवधर्म फाउंडेशन व जिजाऊंच स्वराज्य संघटने मार्फत किल्ले रायगड अभ्यास मोहीम झाली उत्साहात पुर्ण.

जय शिवराय,

रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

प्रत्येक महिन्यातून एक वेळेस गडाची स्वछता आणि माहिती घेण्यासाठी या दोन्ही संघटना मोहीम आयोजित करतात अशीच एक मोहिम नुकतीच पार पडली.

रायगड दि २३डिसेंम्बर २०२०
शिवधर्म फाउंडेशन आणि जिजाऊंचं स्वराज्य संघटनेमार्फत किल्ले रायगड येथे नुकतीच दोन दिवसांची अभ्यास मोहीम आयोजित केली होती दोन्ही संघटना शिवकार्यामध्ये अग्रेसर असुन महाराष्ट्रभर ह्या संघटनेच्या शाखा आहेत. महाराष्ट्रामधील शिवभक्तांसाठी खास रायगड ची माहिती देण्यासाठी किल्ल्यावर मोहीम संघटनेने आयोजित केली होती. या दोन्ही संघटनेच्या वतीने मोडिलिपी प्रशिक्षण दिले जाते, गडकोट मोहीम काढून गडकिल्ले संवर्धन, स्वछता कामे केली जातात. या मोहिमेत गडाची प्लॅस्टिक स्वछता करून तसेच गडकिल्ले संवर्धन महत्व पटवून जागृती केली. शिवकार्या मध्ये सतत अग्रस्थानी राहुन कार्य करणाऱ्या दोन्ही संघटनांच्या वतीने अनेक नामांकित मान्यवर मोहिमेला उपस्थीत होते.
मोडिलिपीच्या पहिल्या बॅच मधील मुलांना सन्मानित करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढणारे मावळ्यांचे वंशज आणि मार्गदर्शन करणारी टीम ही गडावर हजर होती.

प्रामुख्याने सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराजे बाजी मोहिते, प्रतापराव गुजर यांचे वंशज सयाजीराजे गुजर, बहिर्जी नाईक यांचे वंशज आबाराव जाधव नाईक यांच्या सोबत जेष्ठ दुर्ग अभ्यासक श्री पराग लिमये सर, शिवधर्म फाउंडेशन शिवकार्य &गडकोट संवर्धन महाराष्ट्र समिती चे अध्यक्ष व मोडिलिपी प्रशिक्षण आयोजक राज तपसे, जिजाऊंच स्वराज्य संघटनेच्या अध्यक्षा व मोडिलिपी प्रशिक्षिका श्रीमती भारतीताई धोंडे पाटील, जिजाऊंच स्वराज्य संघटने च्या उपाध्यक्षा कु. पूर्वा काळे, मोहीम प्रमुख अविनाश येसणे, अक्षय जाधव व गडप्रेमी दिनेश ढगे यांचेसोबतच, सुरज कारंडे, अक्षय खोडक, अंकुश शिवतारे, स्वप्नील कापरे, प्रशांत माहीमकर, स्वप्नील जाधव, मधूमंजिरी नकाते, श्रुती भोईर, शुभदा मोरे, मोहिणी गोळे इत्यादी शिवकार्य करणाऱ्या रणरागिणी व शिवभक्त या मोहिमेत हजर होते असे अध्यक्ष राज तपसे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *