घोडेगाव नगरपंचायत होण्यासाठी महाविकास आघाडी मार्फत

घोडेगाव प्रतिनिधी : मोसीन काठेवाडी
घोडेगाव शहराचा विकास गतिमान करण्यासाठी ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये होण्यासाठी आज दि.१४ रोजी घोडेगाव येथील शिष्टमंडळाने मुंबई मंत्रालय येथे राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन घोडेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली.

१ मार्च २०१४ रोजी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायत मध्ये करण्याची उद्घोषणा नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन मार्फत करण्यात आली होती. परंतु आजतायागत घोडेगाव ग्रामपंचायतचे रुपांतर नगर पंचायत मध्ये झाले नाही . घोडेगाव ग्रामपंचायत ही आंबेगाव तालुक्याच्या मुख्यालयामध्ये असणारी ग्रामपंचायत आहे. सुमारे वीस हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असल्याने ग्रामपंचायतमार्फत सुविधा पुरविण्यात अनेक अडचणी येत आहे व नागरी वसाहती मध्ये वाढ झाल्याने घणकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न भेडसावत असल्याने येथे नगरपंचायत होणे ही काळाची गरज असल्याने अनेक वेळा ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव मंजूर केला व नगरपंचायतची मागणी लावून धरली आहे.

तसेच आज मुंबई मंत्रालय येथे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानमार्फत लेखी निवेदन देण्यात आले.

या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती कैलासबुवा काळे , सखाराम घोडेकर, भिमाशंकर कारखान्याचे संचालक अक्षय काळे, घोडेगावचे सरपंच क्रांती गाढवे , उपसरपंच सोमनाथ काळे , वैभवशेठ काळे, रमेशनाना घोडेकर , माऊली आप्पा घोडेकर ,माजी उपसरपंच सुनील इंदोरे , राष्ट्रवादी घोडेगाव शहर अध्यक्ष किरणशेठ घोडेकर , शिवसेना उप तालुका प्रमुख गोविंद काळे सर शिवसेनेचे नेते मिलिंद काळे , शिवाजीराव घोडेकर , स्वप्नील घोडेकर , नंदकुमार बोऱ्हाडे , प्रशांत गाढवे आदि मान्यवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *