शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीरास प्रचंड प्रतिसाद ५८९ रक्तदात्यांनी केले रक्तदान .

रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

भोसरी:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत साधुराम मंगल कार्यालय मोशी येथे करण्यात आले होते . शिबिराचे उदघाटन, शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, मावळचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांचे हस्ते झाले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, जिल्हा संघटक तुषार सहाणे, उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी, राहुल गवळी, युवा सेना जिल्हा समन्व्यक सचिन सानप, सुरज लांडगे,कुणाल तापकीर, कुणाल जगनाडे, समन्व्यक दादा नारळे, राहुल भोसले, सुखदेव नरळे आबा भोसले,महिला आघाडी भोसरी संघटिका, वेदश्री काळे, स्मिता जगदाळे, आशा भालेकर, मनीषा परांडे, सुजाता आल्हाट, रुपाली आल्हाट, रावसाहेब थोरात,विभाग प्रमुख योगेश जगताप, काका बोराटे, सतीश दिसलें प्रदिप चव्हाण विश्वनाथ टेमगिरे, नितीन बोन्डे, सतीश मरळ, गणेश इंगवले कृष्णा वाळके,राजू भुजबळ, प्रदिप सपकाळ, अनिल दुराफे, युवा नेते अजिंक्य उबाळे, प्रवीण खिलारे हे उपस्थित होते.

डॉ डी. वाय.पाटील ब्लड बँक व यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात रक्तदात्यास 8 जेबी पेन ड्राइव्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपनेते खा. शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, विधानसभा प्रमुख धनंजयभाऊ आल्हाट यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *