नारायणगाव येथे एका इसमाकडून गावठी कट्टा हस्तगत

आरोपी अटक

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)

नारायणगाव पोलिसांनी येथील पूर्व वेशिजवळ एका स्थानिक इसमाकडून सापळा रचून गावठी रिव्हॉल्व्हर हस्तगत करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

दिनांक ४/१२/२०२० रोजी  नारायणगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड  यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, नारायणगावमध्ये खेबडे  वडापाव  समोरील चौकामध्ये एक इसम गावठी बनावटीचा रिव्हॉल्व्हर घेऊन येणार आहे. ही माहिती मिळाली असता तात्काळ पोलीस कॉस्टेबल दिनेश साबळे, पो.कॉ. सचिन कोबल, पो.हवालदार टाव्हरे, पो.कॉ. दुपारगुडे ,पो.कॉ. जायभाये, पो.नाईक शेख यांना खाजगी वाहनाने जाण्यास सांगितले. साधारण रात्री ०८:४५ वाजता एक इसम चौकामध्ये आला. त्याच्या हालचाली या संशयास्पद वाटल्याने तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल दिनेश साबळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोबल यांनी त्याला जागीच पकडले.

पकडलेल्या इसमाकडे अधिक चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याचे नाव पत्ता विचारले त्याने त्याचे नाव नंदकुमार बाळासाहेब साळुंके (रा.नारायणगाव, टेलिफोन कार्यालय समोर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे) असे असल्याचे सांगितले. त्यावेळी तो कावराबावरा होऊन त्याने खिशात हात घालून काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करू लागला म्हणून  त्याचा संशय आल्याने सोबतच्या पंचांसमक्ष त्यास त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकड़े खालील वर्णनाचा एक गावठी बनावटीचा रिवाँल्वर मिळून आला. त्याचे वर्णन खालील प्रमाणे – सुमारे २०,०००/- रू किमतीचा गावठी बनावटीचा रिव्हॉल्व्हर, त्यात सहा होलचे मॅक्झिन, त्याची लांबी २० सेंटीमीटर ०९ मिलीमीटर तसेच बॅरलची लांबी ०८ सेंटीमीटर २ मिलीमीटर तसेच स्ट्रेगर तसेच लोखंडी व लाकडी बट असलेली मिळून आल्याने आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत पो. कॉन्स्टेबल दिनेश दत्तात्रय साबळे यांनी फिर्याद दिली आहे.
ही कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस कॉ. दिनेश साबळे, पो.कॉ सचिन कोबल, पो.कॉ. संतोष दुपारगुडे, पो.कॉ. शाम जायभाये यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास ढमाले हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *