जेष्ठ शिक्षक रतीलाल बाबेल राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात प्रथम

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने घेतलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत मिळविले यश

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष आणि नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरातील गणित व विज्ञान विषयाचे जेष्ठ शिक्षक रतीलाल बाबेल यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने घेतलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. राज्याचे अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्री बाबेल यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.

पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख अकरा हजार रुपये असे होते.

याप्रसंगी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापुसाहेब भुजबळ, प्रा.हरी नरके, शिवाजीराव नलावडे, डॉ. नागेश गवळी, समाधान जेजुरकर, हर्षल खैरनार व महाराष्ट्रातील विविध भागातील असंख्य समता सैनिक उपस्थित होते.

या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा विषय “एक दिवा संविधानाचा” असा होता. कोरोना सारख्या महामारीत जेव्हा देशभरात लोक डाऊन सुरू होते, तेव्हा ही स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास २२२० निबंध या स्पर्धेसाठी आले होते. शिक्षण क्षेत्रातील नामवंत शिक्षकांकडून निबंध तपासणी करण्यात आली.

यापूर्वीही अनेक निबंध स्पर्धेत विविध विषयावर रतीलाल बाबेल यांना राज्यस्तरीय पारितोषिके मिळालेली आहेत. एक उत्कृष्ट वक्ते म्हणून रतीलाल बाबेल यांची पुणे जिल्ह्यात वेगळी ओळख आहे.

या यशाबद्दल ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, सहकार्यवाह अरविंद भाऊ मेहेर, मुख्याध्यापक रवींद्र वाघोले, जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी यांनी बाबेल यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *