कॉंग्रेस शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती… सचिन साठे

बातमीदार : रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

पिंपरी (दि. 22 नोव्हेंबर 2020), पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा बुधवारी 11 नोव्हेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिला आहे. राजीनामा मागे घेण्यास साठे यांनी नकार दिल्यामुळे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणा-यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.

प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस व पिंपरी चिंचवड निरीक्षक राजेश शर्मा आणि नाशिक शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष व पिंपरी चिंचवड निरीक्षक शरद आहेर हे मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर) दुपारी 11 ते 2 या वेळेत निगडी प्राधिकरण येथील हरीदास नायर यांच्या कार्यालयात (सेक्टर 27, ॲक्सिस बँक जवळ) इच्छुकांच्या मुलाखती घेतील. यावेळी इच्छुकांनी व शहर कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिका-यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सचिन साठे यांनी केले आहे. तसेच यावेळी कोरोना – कोविड -19 बाबत सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर पाळावे, सॅनिटायझर वापरावे सर्व नियमांचे पालन करावे असेही आवाहन साठे यांनी केले आहे.