सुवर्ण चतुष्कोण गृहीत धरून जुन्नर तालुक्याचा पर्यटन विकास – खा. डॉ. अमोल कोल्हे

शिव संस्कार सृष्टी व पर्यटनाला जुन्नर तालुक्यात चालना देणार – खा. डॉ. अमोल कोल्हे

नारायणगाव दि १९ (किरण वाजगे, कार्यकारी संपादक) – : जुन्नर तालुक्यात शिव संस्कार सृष्टी, पर्यटन विकासासाठी महामार्ग मजबूतीकरण, बाह्यवळण रस्ते, पुणे नाशिक रेल्वे, व इतर प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प लवकरच पुर्ण होणार असून जुन्नर तालुका हा पुणे, नाशिक, मुंबई आणि अहमदनगर  या चार मोठ्या शहरांचा  सुवर्ण चतुष्कोण गृहित धरून  ‘पर्यावरण पुरक रहिवासी झोन’  म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न आहे.असे प्रतिपादन खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी केले आहे . 

जुन्नर तालुक्यात पर्यटन वाढ होण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना कराव्यात आणि प्रकल्प राबवावेत अशा विविध मागण्या जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या वतीने खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडे करण्यात आल्या. यावेळी झालेल्या बैठकीत खासदार डॉ.कोल्हे नारायणगाव येथील त्यांच्या कार्यालयात बोलत होते. ते पुढे म्हणाले की,जुन्नर तालुक्यात पर्यटन विकासासाठी लवकरच सर्वसमावेशक आराखडा तयार करणार आहोत. जुन्नर पर्यटन विकास संस्थेने केलेल्या सर्व मागण्या तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टीने एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या आहेत. जुन्नर मध्ये पर्यटन वाढीस लागण्याच्या दृष्टीने शिव-संस्कार-सृष्टी आराखडा बनवण्याचं काम चालु आहे, यामध्ये बहुतेक बाबी समाविष्ट करण्यात येतील.

यावेळी जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या वतीने मागण्या करण्यात आल्या. यामध्ये तालुक्यातील विविध गावातील पर्यटन स्थळे निश्चित करुन तेथे पार्किंग लॉट करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे ,शौचालय सुविधा उपलब्ध करणे, दिशादर्शक फलक लावणे, माहिती फलक लावणे, जुन्नर पर्यटन नकाशा लावणे, आदिवासी विकास आणि पर्यटन विभागाचे वतीने होम स्टे करणे, लोक कला संवर्धन करण्यासाठी विविध महोत्स