सेवानिवृत्त मान्यवरांचा व्रतकल्पी गुणगौरव सोहळा यशस्वी

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
शिरोली खुर्द ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, सरपंच व गुणवंत शिक्षक यांचा व्रतकल्पी गुणवंत सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला.

महाराष्ट्र पोलीस दलात ३१ वर्षे अविरत सेवा पूर्ण करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरून गुलाब मोरे हे ३० ऑक्टोबरला सेवानिवृत्त झाले. आपल्या कार्यकाळात गावात सर्वाधिक विकास कामे करणाऱ्या सरपंच साधना मोरे आणि ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे सेवानिवृत्त शिक्षक बबन नामदेव मोरे या मान्यवरांचा सन्मान सोहळा शिरोली खुर्द गावच्या वतीने श्रीराम मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे धुळे आणि नंदूरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष मोरे, माजी सरपंच अरुण मोरे, शाखाप्रमुख सुरेश ढोमसे, पोलीस पाटील विक्रम मोरे, मुख्याध्यापिका इंगळे, माजी उपसरपंच धोंडीभाऊ मोरे, रोहिदास थोरात, परशुराम थोरात, सुदाम मोरे मार्तंड मांडे, श्रीहरी सोमवंशी, जितेंद्र मोरे, जगदीश थोरात भाऊ ढोमसे, विकास मोरे, मनिष मोरे, संपत गायकवाड, कवडे सर, नलावडे सर, दिपाली डोंगरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

गुलाब मोरे यांनी तीस वर्षांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक पदावर सेवेला सुरुवात केली होती. ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर काम करत असताना अनेक गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना जेरबंद केले. मोरे यांना वेगवेगळ्या संस्था व गृह विभागाने पुरस्कार मिळाले. एक मे २०२० ला पोलीस महासंचालकांनी उत्कृष्ट पोलीस अधिकारी म्हणून पोलीस महासंचालक चिन्ह देऊन सन्मानित केले होते.

त्याप्रमाणे शिरोली खुर्द गावच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात साधना नवनाथ मोरे यांनी सर्वाधिक विकास कामे पूर्ण केली. अत्यंत सामान्य कुटुंबातील या महिलेने सरपंच पदाचा कारभार अत्यंत विनम्रपणे हाताळला. तसेच आपल्या विद्वत्तेच्या जोरावर शिक्षक बबन नामदेव मोरे यांनी अनेक यशस्वी विद्यार्थी घडविले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जितेंद्र मोरे, सुरेश ढोमसे, जगदीश थोरात, धोंडीबा मोरे, अनिकेत नायकोडी, संकेत ढोमसे, संदीप थोरात, रमेश ढोमसे यांनी परिश्रम घेतले.