उपमहापौरपदी केशव घोळवे बिनविरोध; आमदार महेश लांडगे यांचे ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’

  • विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतली

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बहुचर्चित उपमहापौर निवडणुकीत भाजपाचे उमेदवार केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. आमदार महेश लांडगे यांच्या ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेट’ या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादीने निवडणुकीतून माघार घेतली.

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आणि अन्य यंत्रणा कामी लावणे योग्य होणार नाही. भाजपाचे सभागृहात बहुमत आहे. अशा परिस्थितीत उपमहापौर पदाची निवडणूक लढवण्यात काहीही हासील होणार नाही, अशी भूमिका घेत भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांना उपमहापौर निवडणूक बिनविरोध करण्याबाबत विनंती केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत माघार घेतली आहे.

उपमहापौर निवडणुकीसाठी पिठासिन अधिकारी कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शुक्रवारी (दि.६) ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निकिता कदम यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, कदम यांनी मुदतीत माघार घेतल्याने घोळवे बिनविरोध उपमहापौर झाले.

आमदार महेश लांडगे विरोधी पक्षनेत्याच्या दालनात…
उपमहापौर तुषार हिंगे यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला.

त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर उपमहापौर कोण याबाबत चर्चांना उधाण आले होते. दोन्ही आमदार समर्थकांमध्ये केशव घोळवे यांना संधी दिल्यामुळे काहीसा नाराजीचा सूर होता. मात्र, शुक्रवारी सकाळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे महापालिका भवनात दाखल झाले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके आणि संबंधित पदाधिकाऱ्यांसोबत प्राथमिक चर्चा केली. त्यानंतर लांडगे यांनी थेट विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या दाखलना धडक दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूवीर तसेच भाजपाला बहुमत असताना निवडणूक यंत्रणा कामाला लावणे योग्य होणार नाही, अशी विनंती केली.

यानंतर विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आणि नगरसेविका मंगला कदम यांनी आमदार लांडगे यांच्या विनंतीला मान देत उपमहापौर निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली.

पक्षांतर्गत गटबाजी, मतभेदाला तिलांजली

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष यांच्यात आपल्याच मतदारसंघातील नगरसेवकाला पद देण्याबाबत चढाओढ होती. मात्र भाजपमधील मुंडे गटाने मोर्चेबांधणी केली होती. आपल्याच गटातील नगरसेवकांला उपमहापौरपदाची संधी मिळावी या