एक दिवा उद्याच्या उमेदीचा…… कु. वर्षा जगताप

बातमीदार : रोहित खर्गे विभागीय संपादक

पिंपरी : दि १ नोव्हेंबर, आज राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने ( एक दिवा उद्याच्या उमेदीचा ) ह्या उपक्रमाचे आयोजन कु. वर्षा जगताप यांनी ऐआॅन इव्हेंट अॅन्ड हाॅस्पिटलिटी, युथ द पाॅवर टु चेंज व मदत प्रतिष्ठान , यांच्या संकल्पनेतून व सोनम पाटिल यांच्या विशेष सहकार्याने घेण्यात आला.

पणत्या रंगवून त्यावर सजावट करून त्या बाजारात विक्री करून येणारा जो निधी आहे तो गरिब,गरजू व बेघर कुटुंबातील मुलांसाठी सोनेरी दिवाळी साजरी करण्याचा मानस ठेवून हा स्तुत्य उपक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी ऋतुजा बिराजदार, गीता मोरे,नेहा पडवळ,हीना अत्तार,मेघना जगताप,शलाका बनकर,स्नेहल लायगुडे,अश्विनी पवळ, सायली निकम, सारिका ढमे,फातिमा अन्सारी, रविराज काळे, राजश्री आहिरे यांच्या सहभागाने केला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती वीरेंद्र बहल, पल्लवी पांढरे, मनिषा गटकळ, यांची होती.