नगर-कल्याण महामार्गावर कार दुचाकीचा भीषण अपघात :-दुचाकीस्वार ठार
बेल्हे (वार्ताहर- विभागीय संपादक रामदास सांगळे):-
नगर-कल्याण महामार्गावर बेल्हे येथे स्विफ्ट कार व दुचाकी यांची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला. ही घटना शुक्रवार (दि.२३) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की नगर दिशेकडून येणारी स्विफ्ट मोटार कार (एम.एच २० सी.पी ९६००) ने बाजूच्या वाहनास ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात समोरून पेट्रोल पंपातून पेट्रोल भरून येणाऱ्या दुचाकी ( एम.एच १४ जी. क्यू ७२८४) जोरदार धडक दिली.या अपघातामध्ये दुचाकीस्वार मधुकर आबाजी गुंजाळ (रा. बेल्हे, ता.जुन्नर, जि पुणे) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा दवाखान्यात नेण्यापूर्वी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बेल्हे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सदरच्या स्विफ्ट मोटार कार मध्ये पोलीस नावाचा बोर्ड होता.ही एका पोलिस कर्मचाऱ्याची खाजगी कार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून नक्की हा पोलीस आहे का? याचीही चौकशी पोलीस करत आहेत.
मधूकर आबाजी गुंजाळ हे बेल्हे येथील एक प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने त्यांच्या अपघाती निधनामुळे गुंजाळ कुटुंबियांवर तसेच बेल्हे गावावर शोककळा पसरली आहे.