स्थायी समिती कार्यालयात तीन वर्षे जास्त कार्यकाळ असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा विशाल कसबे

बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी दि २२ ऑक्टोबर
स्थायी समिती कार्यालयात 3 वर्षापेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या कर्मचार्यांच्या त्वरित बदल्या करा अशा आशयाच पत्र पिंपरी चिंचवड NSUI अध्यक्ष विशाल कसबेे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.

कसबे यांनी पत्रात म्हटले आहे कि, शासन नियमानुसार कोणत्याही सरकारी कार्यालयात एखाद्या विभागात ३ वर्षापेक्षा जास्त काळ एखाद्या कर्मचार्यास ठेवता येत नाही त्याची इतर विभागात बदली करावी लागते. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या कार्यालयात स्थायी समिती सभापतीचे स्विय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे हे चार वर्षापासून काम करित आहेत , आता पद्दोन्नतीमुळे लिपिक झालेले दिनेश अठवाल हे गेली १० वर्षे शिपाई म्हणून याच विभागात काम करित आहेत.

तर शिपाई म्हणून याच विभागात अरविंद कांबळे हे गेली ६ वर्षे या विभागात काम करित आहेत. स्थायी समितीत आर्थिक विषयांना मान्यता दिली जाते. त्यामुळे या ३ कर्मचार्यांचे आर्थिक हितसंबंध निर्माण होऊ शकतात, म्हणून स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक दिनेश अठवाल, व शिपाई अरविंद कांबळे यांची त्वरित दुसर्या विभागात बदली करण्यात यावी. विशाल कसबे हे नॅशनल काँग्रेेस पार्टीचे काम करतात