ड्रग्ज चे कनेक्शन छोटा राजन टोळीपर्यंत

बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी : चाकण येथे दोन आठवड्यापूर्वी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने वीस कोटी रु चे मेफेड्रॉन जप्त केले होते. आता या प्रकरणाचे कनेक्शन छोटा राजन टोळीपर्यंत असल्याचे समोर आले आहे. या टोळीत पूर्वी सक्रिय असलेला सराईत गुन्हेगार व एक नाजेरियन वेक्तीसह १४ जणांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी आता अटक केली आहे.

या आरोपींना रांजणगाव येथील बंद पडलेल्या कंपनीत तब्बल १३२ किलो मेफड्रॉन बनवल्याचे उघड झाले आहे.

तुषार सुर्यकांत काळे (रा. बोरीवली), राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी (रा. वसई), किरण राजगुरू, अशोक संकपाळ, किरण काळे यांच्यासह झुबी इफनेयी उडोको या नायजेरियन गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात चेतन फक्कड दंडवते (२८, रा. मलठण-आंब्रेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (२५, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (२५, रा. पाचर्णे मळा, ता. शिरुर), संजिवकुमार बन्सी राऊत (४४, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (३१, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *